सहकार महर्षी कोल्हे कारखान्यावर आहेर यांचे व्याखान

नगर : साखर उद्योगतील नामवंत तज्ज्ञ, प्रथितयश सल्लागार श्री. वा. र. आहेर यांचे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यावर “शून्य टक्के मिल बंद तास या संकल्पनेची अंमलबजावणी”या विषयावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान झाले.
साखर कारखान्याचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ संचालक बिपीनदादा कोल्हे यांच्या पुढाकाराने कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी आयोजित केलेल्या, अधिकारी आणि कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यासाठी टेक्निकल स्कील डेव्हलपमेंट कार्यक्रमांतर्गत श्री.आहेर यांचे व्याख्यान आयोजित केले होते..
कारखान्याचे अधिकारी श्री. शिंदे यांनी प्रास्ताविक करताना, श्री. आहेर यांचा परिचय करून दिला. त्यानंतर कार्यकारी संचालक सुतार यांनी शून्य टक्के मिल बंद तास या संकल्पनेचे महत्त्व विशद केले आणि श्री आहेर यांचे कारखान्याशी निकटचे संबंध असल्याचे सांगितले.
नंतर श्री आहेर यांनी कारखाना सुरू असताना मिल बंद झाल्यावर लाखो रुपयांचे नुकसान होते हे आकडवारीनिशी समजून सांगितले.
यावर उपाययोजना म्हणून “शून्य टक्के मील बंद तास या संकल्पनेची अंमलबजावणी” याविषयी शास्त्रीय पद्धतीने माहिती दिली आणि किमान पाच टक्के स्टॉपेजेस आपण सुयोग्य नियोजन करून अनलोडर ते शुगर ग्रेडर पर्यंतचे ऑफ सिझन मध्येच कसोशीने मेंटेनन्स करून वेळेचे, कामगारांचे, स्पेशल पार्टचे आणि व्यवस्थापनातर्फे आर्थिक नियोजन करून आपण साखर कारखान्यावर “शुन्य टक्के मिल बंद तास या संकल्पनेची अंमलबजावणी करू शकतो आणि कारखान्याचे आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते, असे आहेर यांनी विविध उदाहरणांसह पटवून दिले.