सर सय्यद अहमद खान
आज सोमवार, मार्च २७, २०२३ रोजीचे
पंचांग आणि दिनविशेष
युगाब्द : ५१२५
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक आज सौर चैत्र ०६, शके १९४५
सूर्योदय : ०६:३७ : सूर्यास्त : १८:५१
चंद्रोदय : १०:३५ चंद्रास्त : ००:२४, मार्च २८
शक सम्वत : १९४५
संवत्सर : शोभन
उत्तरायण
ऋतू : वसंत
चंद्र माह : चैत्र
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : षष्ठी – १७:२७ पर्यंत
नक्षत्र : रोहिणी – १५:२७ पर्यंत
योग : आयुष्मान् – २३:२० पर्यंत
करण : तैतिल – १७:२७ पर्यंत
द्वितीय करण : गर – ०६:१०, मार्च २८ पर्यंत
सूर्य राशि : मीन
चंद्र राशि : वृषभ – ०४:२५, मार्च २८ पर्यंत
राहुकाल : ०८:०९ ते ०९:४१
गुलिक काल : १४:१६ ते १५:४७
यमगण्ड : ११:१२ ते १२:४४
अभिजित मुहूर्त : १२:२० ते १३:०८
दुर्मुहूर्त : १३:०८ ते १३:५७
दुर्मुहूर्त : १५:३५ ते १६:२४
अमृत काल : १२:०४ ते १३:४६
वर्ज्य : ०६:५९ ते ०८:४०
वर्ज्य : २१:३२ ते २३:१७
२७ मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक रंगभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो. १९६१मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटने या दिवसाची सुरुवात केली होती. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये साजरा झाला. त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो. यानिमित्ताने जगभरातील नाट्य जगतातील महत्त्वाची एक व्यक्ती संदेश देते. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग आहे. १९६२ साली ज्यो कॉक्चू यांना संदेश देण्याचा पहिला मान मिळाला होता.
वैदिक काळापासून ते आजच्या कीर्तन परंपरेपर्यंत तसेच कोकणातील दशावतारी नाटके,तमाशा, बहुरुपी, वीरकथा, देवासुर संग्राम तसेच पौराणिक आणि लोककथेच्या रूपातून आजची आधुनिक नाट्यकला जन्मास आली. मराठी रंगभूमीला सुगीचे दिवस येण्यापूर्वीच्या काळात लोकांसाठी मनोरंजनाचे व प्रबोधनाचे माध्यम म्हणून पोवाडा, भारुड, कीर्तन, दशावतारी खेळ हीच मुख्य साधने होती. त्यानंतर ‘नाटक’या कला प्रकाराला मराठी रसिक प्रेक्षकांनी भरभक्कम पाठबळ दिले आणि रंगभूमी बहरली. १८४३ मध्ये सांगली येथे – विष्णुदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’ या नाटकाने मराठी रंगभूमीची सुरुवात झाली.
आज जागतिक रंगभूमी दिन आहे
सर सय्यद अहमद खान- हे १९व्या शतकातील एक भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक होत. भारतातील मुस्लिम समाजामध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रसार करून त्यांचा सामाजिक विकास साधण्यात त्यांचे योगदान महत्वाचे मानले जाते. सर सय्यद यांनी मोहमेडन अँग्लो-ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली ज्याला त्यांच्या म्रूत्यूनंतर इ.स. १९२० मध्ये अलिगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणून विद्यापिठाचा दर्जा देण्यात आला.
सर सय्यद यांनी भारतीय मुस्लिम समाजातील अनेक अनिष्ट प्रथांवर हल्ला चढवला. त्यांचा बुरखा पध्द्तीला सक्त विरोध होता. त्यांनी सुफी पीर व फकिरांच्या पद्धतीला विरोध करून इस्लामच्या एकेश्वरवादाच्या शिकवणुकीवर भर दिला. आपल्या मतांच्या प्रचारासाठी त्यांनी इ.स. १८७० मध्ये तहजी़ब-उल-अखलाक या उर्दू नियतकालिकाची सुरूवात केली. इ.स. १८७७ मध्ये त्यांची इंपिरियल विधीमंडळात निवड करण्यात आली आणि इ.स. १८८८ मध्ये त्यांना सर या पदवीने सन्मानित करण्यात आले.
•१८९८: भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते सर सय्यद अहमद खान यांचे निधन. (जन्म: १७ ऑक्टोबर १८१७)
गायक भार्गवराम आचरेकर – भार्गवरामांचा १९२५ च्या आसपास ललितकलादर्शमध्ये प्रवेश झाला. या कंपनीत त्यांचे संगीत व अभिनयाचे शिक्षण सुरू झाले. सुरुवातीला ते छोट्या-मोठ्या स्त्री-भूमिका व इतर कामेही करत. ललितकलादर्शच्या अनेक नाटकांतून त्यांनी कामे केली. मामा वरेरकरांच्या ‘सोन्याचा कळस’ या नाटकातील ‘बिजली’ ही भूमिका अभिनय आणि गायन या दोन्ही दृष्टींनी गाजली.
मा. भार्गवराम म्हणून त्यांचे नाव झाले. या नाटकाचे संगीत गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे यांचे होते. त्यामुळे भार्गवरामांचे पुढील संगीत शिक्षण रामकृष्णबुवा वझेंकडे सुरू झाले. याबरोबरच वझेबुवांचे चिरंजीव शिवरामबुवा वझे, मुहंमद बशीर खाँ साहेब, कागलकरबुवा, रामकृष्णबुवा बापट इत्यादी बुजुर्गांकडूनही भार्गवरामांनी संगीतविद्या मिळवली. बैठकीचे शास्त्रोक्त गाणेही पक्के होत गेले.
याशिवाय पेंढारकरांनी संस्कृत श्लोक वगैरेचे पठण करून घेतल्यामुळे त्यांची वाणी शुद्ध, स्वच्छ व अस्खलित झाली. हा गुण त्यांच्या गायनातून प्रकर्षाने जाणवतो.
त्यांनी ललितकलेत बारा वर्षे काढली. ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’, ‘पुण्यप्रभाव’, ‘कृष्णार्जुन युद्ध’, ‘शिक्का कट्यार’, ‘सोन्याचा कळस’, ‘वधूपरीक्षा’ इत्यादी ललितकलादर्शच्या नाटकांतून त्यांनी विविध भूमिका केल्या. त्यांना १९३७ साली कंपनीच्या दुरवस्थेमुळे पेंढारकरांनीच गावी जायला सांगितले. त्यांनी १९४०-४१ च्या सुमारास स्वत:ची ‘ललितकला संवर्धक’ ही कंपनी काढली. भार्गवरामांनी या कंपनीच्या ‘संगीत सौभद्र’(कृष्ण), ‘मानापमान’ (धैर्यधर), ‘पुण्यप्रभाव’ (भूपाल) या नाटकांतून पुरुष-भूमिकाही समर्थपणे साकारल्या. आर्थिक जम न बसल्यामुळे ही कंपनीही बंद करावी लागली.
पुढे गंगाधरपंत लोंढे यांच्या राजाराम संगीत मंडळीच्या नाटकांतूनही त्यांनी भूमिका केल्या. त्यांच्या ‘विद्याहरण’ या नाटकातील कच, ‘प्रेमसंन्यास’मधील जयंत, ‘सौभद्र’मधील अर्जुन या भूमिका विशेष गाजल्या. याच दरम्यान भार्गवराम विवाहबद्ध झाले व पुण्यात स्थायिक झाले. दामुअण्णा मालवणकरांच्या ‘प्रभाकर नाट्यमंदिर’, तसेच ‘भारत नाट्यकला’ या काही नाट्यसंस्थांतूनही भार्गवरामांनी काम केले. भार्गवरामांनी जुन्या नाटकांबरोबरच ‘लग्नाची बेडी’ (पराग), ‘उसना नवरा’ (गिरीश) अशा काही नव्या नाटकांमधूनही भूमिका केल्या.
नाटकाबरोबरच शास्त्रीय संगीताच्या बैठका, गायनाच्या शिकवण्या, आकाशवाणीवरील कार्यक्रम असे उपक्रम चालू होते. जुन्या नाटकांचा जमाना संपत आला होता. नव्या संगीत नाटकांचे युग सुरू झाले. ‘नाट्यसंपदा’चे १९६७ साली ‘कट्यार काळजात घुसली’ हे संगीत नाटक आले. या नाटकाद्वारे भार्गवराम आचरेकरांचे वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी संगीत रंगभूमीवर पुनरागमन झाले. या नाटकात त्यांनी पं. भानुप्रसादचे काम केले. अतिशय छोटी भूमिका असली तरी भार्गवरामांचे काम आणि गाणे प्रेक्षकांच्या मनावर ठसले. या नाटकातील ‘दिन गेले भजनावीण’ हे पद व यमनमधील ‘तराण्यां’तून त्यांच्या गाण्याचा कस दिसतो. ‘कट्यार’च्या जवळजवळ ५०० प्रयोगांतून त्यांनी काम केले. ललितकलादर्शच्या हीरक महोत्सवी वर्षात १९६८ साली ‘सौभद्र’ या नाटकातून त्यांनी श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती.
भार्गवरामांचा आवाज वजनदार व गाणे कसदार होते. त्यांच्याजवळ विविध रागांतील बंदिशींचाही भरणा होता. ते सातत्याने गायनाची मेहनत करत. त्यांच्या शिष्यवर्गात अविनाश आगाशे यांचे प्रमुख नाव घ्यावे लागेल. ते बरीच वर्षे त्यांच्याकडे शिकले. याशिवाय मुकुंद उपासनी, मुकुंद मराठे यांनाही त्यांची तालीम मिळाली. अनेकांना नाट्यसंगीताचे, तसेच गायनाचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या एकसष्टीनिमित्त ‘आवडीने भावे’ (संगीत : भार्गवराम आचरेकर) व ‘दिन गेले भजनावीण’ या दोन गाण्यांची ध्वनिमुद्रिका एच.एम.व्ही.ने काढली. ‘सोन्याचा कळस’ या नाटकातील ‘जगी वंचिता’, ‘अभिलाषा नाही’ या नाट्यपदांची, ‘वधूपरीक्षा’ या नाटकातील ‘सत्पात्र हा’, ‘संन्याशाचा संसार’मधील ‘वांछित भावना’, ‘कुंजविहारी’ नाटकातील ‘त्यजी भक्तासाठी’ अशा नाट्यपदांच्या अनेक ध्वनिमुद्रिका निघाल्या होत्या.
त्यांना १९८३ साली महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे त्यांचा सन्मान करून पुरस्कार देण्यात आला. पुणे महानगरपालिकेतर्फे ‘बालगंधर्व’ पुरस्कार (१९९६); अखिल महाराष्ट्र नाट्य परिषद, सांगलीतर्फे पुरस्कार (१९८९); याशिवाय मराठी रंगभूमी, पुणे; कालनिर्णय, मुंबई व अण्णा कराळे पुरस्कृत ‘संगीत सूर्य केशवराव भोसले’ पुरस्कार आदी पुरस्कारांचे ते मानकरी होते.
१९९७: संगीत नाटकातील अभिनेते व गायक भार्गवराम आचरेकर यांचे निधन. ( जन्म : १० जुलै, १९१० )
घटना :
१६६७: शिवरायांना सोडुन गेलेल्या नेताजी पालकरचे औरंगजेबाने धर्मांतर केले व यांचे नाव महंमद कुली खान ठेवले.
१७९४: अमेरिकन नौदलाची स्थापना झाली.
१८५४: क्रिमियन युद्ध – इंग्लडने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
१९६६: २० मार्च रोजी चोरीला गेलेला फुटबॉलचा विश्वचषक दक्षिण लंडनमधील एका बागेत पिकल्स नावाच्या कुत्र्याला सापडला. त्यानंतर हा चषक १९८३ मधे पुन्हा चोरीला गेला, तो आजतागायत सापडलेला नाही.
१९७७: तेनेरिफ द्वीपावरील धावपट्टीवर पॅन अॅम आणि के. एल. एम. या दोन बोईंग ७४७ प्रकारच्या विमानांची टक्कर होऊन ५८३ जण ठार झाले.
• मृत्यू :
•१९९२: साहित्यिक, गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. शरच्चंद्र वासुदेव चिरमुले यांचे निधन.
जन्म :
१९५३ : मध्यप्रदेश, ( ग्वालियर ) चे माजी खा. रामसेवक के सिंग यांचा जन्म दिवस.
१९६५ निवेदक, मराठी व हिंदी नाटक तसेच चित्रपट कलाकार रेणुका शहाणे हीचा जन्म दिवस.