ऊस पिकाच्या वाढीसाठी संजीवके

आवडल्यास ही बातमी शेअर करा

संजीवकांचा संतुलित वापर केला तर त्याचे खूप चांगले परिणाम दिसून येतात हे मी माझ्या शेतात अनुभवले आहे. म्हणून हा लेखन प्रपंच….

1.) संजीवके वनस्पतीच्या शरीरात अत्यंत सुक्ष्म प्रमाणात निर्माण होतात. पाने, मुळे, खोड यांच्या कोवळ्या अंकुरात तयार होतात. तेथून जेथे गरज असेल तेथे ती वाहुन नेली जातात.
2 ) बेण्याचा रुजवा . कोंब फुटणे, पालवी येणे, मुळे सुटणे, फुटवे येणे, कांडयांची संख्या वाढवणे, लांबी व घेर वाढवणे या सर्व जैविक प्रक्रिया संजीवकांच्या विशिष्ट संतुलनामुळे घडतात.
४ ) संजीवकांचे संतुलन चांगले असेल तर जमिनीतून दिलेल्या खतांचे पाण्याचे चांगले शोषण होते. प्रकाश संश्लेशण क्रिया व्यवस्थित घडते.
५ ) फुटव्यांची मर कमी होते .

ऑक्झीन्स( IBA )

१ ) पेशी विभाजन चांगले करते. पेशींची लांबी वाढवते .
२ ) मुळे सुटण्यास मदत होते .
३ ) पीके दीर्घकाळ हिरवी राहतात
४ ) सगळ्यात महत्वाच म्हणजे फुटवे एकसमान वर येतात.


जिबरेलिन्स GA

१ ) उसासाठी हे खूप प्रभावी आहे .
२ ) फुटव्यांची संख्या टिकुन राहते. संख्या व जाडी वाढते
३ ) कॅबियम या भागातील पेशींचे विभाजन घडवते. त्यामुळे उसाच्या पेरांची जाडी वाढते.
सायटोकायनिन ( सीक्स बी .ए. )
१ ) ऊसाच्या आरंभ वाढीच्या अवस्थेमध्ये पांढऱ्या मुळीत तयार होते.
२ ) पेशी विभाजन आणि तिचा आकार वाढवणे हे मुख्य कार्य सिक्स बी .ए. करते .
३ ) पाणे रुंद होतात व प्रकाश संश्लेशण प्रक्रिया वाढते
४ ) फुटवे मरण्याचे प्रमाण कमी राहते .
५ ) पानांत तयार झालेली साखर कांड्यात वाहुन नेली जाते.
असे खूप फायदे संजीवकांमध्ये आहेत.
फवारणी आधीचा ऊस व फवारणी नंतरचा ऊस याचा फरक दिसून येतोच .


मुकुंद साबळे, कोल्हापूर
9022989442

(श्री. साबळे यांनी स्वत:च्या शेतामध्ये प्रयोग करून, स्वानुभवावर आधारित लिखाण केले आहे.)

कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित, आष्ट्याचे नामवंत शेतकरी संजीव माने यांनी संजीवकांबद्दल दिलेली सविस्तर माहिती वाचा ‘शुगरटुडे’च्या अंकात..
त्यासाठी खालील लिंकवर जा

https://online.pubhtml5.com/ublkn/qrnf/#p=1

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »