रविवारची साखर कविता

कोयता
हाती धरुनी कोयता दिसभर।
नवरा बायकोने केली मरमर ।।
अन् ऊस तोडला हो गाडीभर ।
तेव्हा मिळते सांजेला भाकर।।
पंधरा दिवसाला होई पगारपानी ।
आम्ही आंगठ्याचे आहोत धनी।।
उचल फेडून फेडून राजाराणी ।
कायमच दशा असे केविलवाणी।।
मलई मुकादमाला,वाढे आम्हाला।
रात्री पहाटेच्या खेपा घालून त्याला।।
दुकानदारांची उधारी, अन उसनवार।
सोसनां भार,राजासर्जाला पडे मार ।।
शेळीबकरी गाय वासरू वेळेला आधार।
हाती धरून कोयता ऊस तोडू ट्रकभर ।।
हेही दिस जातील होऊ आत्मनिर्भर ।
तोरणं बांधु गाडीलाअन होऊं कणखर।।
रचनाकार :
श्री. आहेर वा.र. नाशिक
९९५८७८२९८२