हेल्पर ते साखर कारखानदार

संघाच्या मुशीत वाढलेल्या एका दिग्गजाची यशोगाथा
साखर आणि सहकार क्षेत्राला समर्पित असलेल्या शुगरटुडे मॅगेझीनच्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत एका दिग्गज व्यक्तिमत्त्वाला.
ज्यांचा करिअरचा प्रवास पुण्यातील एका मोटर रिवाडिंग शॉपमध्ये हेल्पर म्हणून सुरू झाला आणि आज ते आहेत एका खासगी साखर कारखान्याचे संस्थापक आणि चेअरमन.
शिक्षण अवघं दहावी असताना, त्यांनी समाजकारण आणि उद्योग क्षेत्रात डोंगराएवढं काम उभे केले आहे.
या महनीय व्यक्तिमत्त्वाचे नाव आहे, मा. श्री. पांडुरंग राऊत. ते आहेत श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे अध्यक्ष. शून्यातून विश्वनिर्मिती हा वाक्प्रचार मा. राऊत साहेबांना तंतोतंत लागू होतो. पण त्यांनी हे विश्व स्वत:साठी, नव्हे तर सर्वसामान्यांसाठी उभे केलं.
त्यांनी केवळ साखर कारखानाच नव्हे, तर अनेक संस्थांची उभारणी केली आहे.
सर्वांसाठी प्रेरणादायी असलेली त्यांची हेल्पर ते साखर कारखानदार ही झेप ऐकू या त्यांच्याकडूनच….
This website is usefull and informational.
Thanks for your feedback