‘छत्रपती’चे माजी संचालक तात्याराम बापू शिंदे यांचे निधन

पुणे : राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे सासरे आणि श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगरचे संस्थापक संचालक, आदर्श शेतकरी तात्याराम बापू शिंदे यांचे रविवारी दु:खद निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.
अंथुर्णे (ता. इंदापूर) येथे त्यांचा अंत्यविधी झाला. यावेळी सहकार, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.
वारकरी संप्रदायाचा वारसा असलेले तात्याराम बापू शिंदे हे जुन्या पिढीतील अत्यंत कष्टाळू आणि जाणते व्यक्तिमत्त्व होते. ‘छत्रपती’चे ते संस्थापकच, नव्हे तर चारवेळा संचालक होते. तसेच पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक आणि इंदापूर सहकारी खरेदी-विक्री संघाचेही ते संचालक होते.
राजकारणाबरोबरच, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय योगदान राहिले. ग्रामीण भागात राहूनही त्यांनी तिन्ही मुलींना पदवीधर केले.
‘शुगरटुडे’ परिवाराची स्व. तात्याराम बापूंना भावपूर्ण आदरांजली.