अवघड दुखणं ट्रकमालकाचं!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

रविवारची साखर कविता

गाळपास ऊस वाहतूकीची आहे जरूर,

कारखाना करी ट्रकमालकासंगे करार।

दर टन दर किलोमीटरने बिल देणार,

जवळच्या वाहतुकीने नुकसान होणार ।।

मजूर भरती करायची ट्रक मालकाने,

पैशाची उचल घ्यायची मुकादमाने।

मजूर गोळा करून द्यायचे नगाने,

एकट्रक एकच टोळी या न्यायाने।।

मग सुरू होतो बिनपैशाचा तमाशा,

ट्रक मालकाच्या सुरू होतात उठाबशा।

मजूर येती कमी ऊसतोड होई बेतात,

ट्रक मालक येई त्यात नुकसानात।।

मुकादम रूबाबात, मालक रानात,

डिझेल दर वाढीने मालक कोमात।

या मागणीला कारखाना देई वेटोळे,

चेअरमनच्या जवळचे म्हणून डोस मिळे।।

आरटीओचे हप्ते भरून बेजार,

पण प्रचाराला ट्रकने घरदार जाणार।।

रचना:

आहेर वा.र. (नाशिक).

९९५८७८२९८२

(टीप : या कवितेचा कुणालाही दुखवण्याचा किंवा टीका करण्याचा उद्देश नाही, तर एक ज्वलंत समस्या वेगळ्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न आहे : शुगरटुडे)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

One comment

  1. Whatever may be Sugar cane is only low paid that is per kg of cane maximum rate is RS 3.50 /+ where as any vigitable paid at the rate of RS 10 to 20/-per kg . Think well and act accordingly.

Leave a Reply

Select Language »