शंभर कोटींचे कर्ज देतो म्हणून ३० लाखांची फसवणूक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सोलापूर : गुजरात येथील युनिव्हर्सल कंपनीने शंभर कोटींचे कर्ज देतो म्हणून विठ्ठल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून ३० लाख रुपये प्रोसेसिंग फी घेऊन कर्ज किंवा प्रोसेसिंग फी परत न करता फसवणूक केली आहे.

याप्रकरणी बडोदा येथील युनिव्हर्सल कंपनीचे जिग्नेश प्रवीणभाई कुरुंदाळे, जिग्नेश सोनी व इतर संचालकांविरुद्ध कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठल कॉर्पोरेशनचे असिस्टंट जनरल मॅनेजर वैभव काशीद यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, विठ्ठल कॉर्पोरेशनने युनिव्हर्सल फायनान्स कंपनीकडे कर्जाची मागणी केली होती. त्यानंतर या कंपनीने १० हजार रुपये ‘कारखाना साईट व्हिजिट फी’ घेतली आणि युनिव्हर्सल कंपनीचे संचालक जिग्नेश सोनी यांनी कारखान्याला भेट दिली. २८ डिसेंबर २०२२ रोजी जिग्नेश सोनी यांनी विठ्ठल कॉर्पोरेशनकडून कर्जाबाबत सर्व कागदपत्रे लिहून घेतली. पुणे येथे १०० कोटी रुपयांच्या करारावर सह्या घेतल्या व त्याच दिवशी विठ्ठल कॉर्पोरेशनकडून प्रोसेसिंग फी व इतर चार्ज म्हणून ३० लाख रुपये भरून घेतले. युनिव्हर्सल कंपनीने १०० कोटी रुपये विठ्ठल कॉर्पोरेशनच्या खात्यावर वर्ग करण्याचे मान्य केले. मात्र ठरल्याप्रमाणे या कंपनीने कर्ज दिले नाही.’

पुढील तपास पोलिस निरीक्षक गोपाळ पवार करत आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »