२८ कारखान्यांकडून शून्य एफआरपी

पुणे : राज्यातील यंदाचा साखर हंगाम अर्धा संपला तरी एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना देण्यामध्ये कारखाने कुचराई करत असल्याचे निदर्शनास येत आहे. ताज्या आकडेवारीनुसार अद्याप एफआरपीचा छदामही न दिलेल्या साखर कारखान्यांची संख्या तब्बल २८ आहे.
या साखर कारखान्यांची नावे अशी :
- गजानन सहकारी (डीव्हीपी कमोडिटी)
- गंगाखेड शुगर, गंगाखेड
- योगेश्वरी शुगर, लिंबा – पाथरी
- ट्वेन्टी वन शुगर, साईखेडा, सोनपेठ
- तुळजाभवानी शुगर, आडगाव, परभणी
- टोकाई शुगर, कुरुंदा – हिंगोली
- कुंटुरकर शुगर, कुंटूर – नांदेड
- ट्वेन्टी वन शुगर, शिवणी – नांदेड
- पणंगेश्वर शुगर, पानगाव – लातूर
- ट्वेन्टी वन शुगर, मळवटी – लातूर
- पैनगंगा शुगर, बुलढाणा
- वेंकटेश्वरा शुगर, रामटेक – नागपूर
- किसनवीर सहकारी, वाई – सातारा
- किसनवीर खंडाळा
- मकई सहकारी, माकणीनगर, सोलापूर
- लोकनेते बाबूराव पाटील ॲग्रो, मोहोळ – सोलापूर
- इंद्रेश्वर शुगर, उपळाई – सोलापूर
- मातोश्री लक्ष्मी शुगर, अक्कलकोट
- क्विनर्जी इंडस्ट्रीज, (भाऊसाहेब बिराजदार सहकारी) उमरगा
- अयान मल्टिट्रेड (बाणगंगा सहकारी), भूम
- मुळा सहकारी, सोनई – अहमदनगर
- गंगामाई इंडस्ट्रीज, शेवगाव -अहमदनगर
- सचिन घायाळ शुगर्स, (श्री संत एकनाथ सहकारी), पैठक
- श्री रेणुकादेवी शरद सहकारी, पैठण
- घृष्णेश्वर शुगर, खुलताबाद
- खडकपूर्णा ॲग्रो, (सिद्धेश्वर सहकारी) सिल्लोड
- श्रद्धा एनर्जी अँड इन्फ्रा प्रा.लि, परतूर – जालना
- छत्रपती सहकारी, माजलगाव
ही आकडेवारी १५ डिसेंबर २०२२ रोजीपर्यंतच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या पाक्षिक आढावा परिपत्रकातील आहे. त्यानंतरचा पाक्षिक अहवाल लवकर प्रसिद्ध होईल. साखर आयुक्त कार्यालयाकडून या कारखान्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.
या परिपत्रकारनुसार, एकूण १८९ साखर कारखाने यंदा गाळप करत आहेत. २३७ लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. या उसाची रक्कम ७४०७ कोटी रूपये (ऊसतोड आणि वाहतूक खर्चासह) भरते. देय एफआरपी ५६४४ कोटी रुपये असून, ४३१२ कोटी रुपये साखर कारखान्यांनी अदा केले आहेत. हे प्रमाण सुमारे ७६ % आहे.