एकच ध्यास,आमचा विकास!!!

इथे खड्ड्यात पडलाय आमचा विकास
पेपर फुटीने घायाळ आमचा विकास
टॅंकर लाॅबीत फसला आमचा विकास
इथेनॉलशी घोटाळला आमचा विकास ||१||
दुध भेसळीत बुडाला आमचा विकास
झेडपीच्या शाळा बंद, हा आमचा विकास
बियाण्यात भेसळ हाच आमचा विकास
कर्जमाफीत हैराण , हा आमचा विकास ||२||
लाखो कोटी कर्जात डुबे आमचा विकास
लाडक्या बहिणी हा नाही आमचा विकास
कुंभमेळ्याला वृक्षतोड , आमचा विकास
महिला असुरक्षित, हा आमचा विकास ||३||
समृद्धीवर मरण, हा आमचा विकास
महागाई, भ्रष्टाचार हा आमचा विकास
शेतमालाला कमी भाव,आमचा विकास
बेकारी, चलनवाढ, हा आमचा विकास ||४||
अमेरिका जी हुजूर, हा आमचा विकास
न मिळे पेयजल, हाच आमचा विकास
इडा पीडा टळो, इथे बळीचे राज्य येवो
शेतमालाला रास्तभाव, आमचा विकास ||५||
इंजिनिअर कवी -वाळू आहेर नाशिक






