`छत्रपती` निवडणुकीत जय भवानीमाता पॅनलचा मोठा विजय

पुणे : श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुकीत, उपमुख्यमंत्री अजित पवार प्रणीत आणि पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखालील जय भवानीमाता पॅनलने मोठा विजय मिळवला. विरोधी छत्रपती बचाव पॅनलला पराभवाचा धक्का बसला आहे. जाचक कारखान्याचे नवे अध्यक्ष असणार, असे आता स्पष्ट झाले आहे.
एक नंबर गटात लासुर्णेमध्ये पृथ्वीराज जाचक यांना 11,694 मते मिळाली. तर सहकारी शरद जामदार यांना 10 हजार 529 मते मिळाली.
विरोधी छत्रपती बचाव पॅनलचे उमेदवार संजय निंबाळकर यांना 4850 तर प्रताप श्रीरंग पवार यांना 4197 मते मिळाली. पृथ्वीराज जाचक यांचे मताधिक्य 6400 राहिले आहे. तसेच गट नंबर दोन सणसरमध्ये रामचंद्र विनायक निंबाळकर यांना 10 हजार 929 मतं मिळाली, तर शिवाजी रामराव निंबाळकर यांना 10 हजार 431 मते मिळाली.
विरोधी उमेदवार संग्रामसिंह दत्तात्रय निंबाळकर यांना 5165 मते, तर महादेव शिरसाठ यांना 3197 मते मिळाली. या गटामध्ये मताधिक्य 5764 मतांचे राहिले आहे. उद्धटमध्ये उमेदवार पृथ्वीराज श्रीनिवास घोलप यांना 9672 मते, तर गणपत सोपान कदम यांना 9297 मते मिळाली.
या ठिकाणी करणसिंह घोलप यांना 6,961 मते मिळाली. तानाजीराव थोरात यांना 4721 मते मिळाली. या गटाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गट नंबर चार अंथुर्णेमध्ये प्रशांत दासा दराडे यांना 11,180 मते मिळाली तर अजित नरूटे यांना 11 हजार 90, विठ्ठल पांडुरंग शिंगाडे यांना 10235 मते मिळाली. बाबासाहेब झगडे यांना 4190 मते तर राजेंद्र पाटील यांना 4860 मते मिळाली.
सोनगाव गटामध्ये अनिल सिताराम काटे यांना 11,789 मते मिळाली. तसेच बाळासाहेब कोळेकर यांना 11768 तर संतोष मासाळ यांना 18307 मते मिळाली. विरोधी रवींद्र टकले यांना 5482 मते मिळाली. गुणवडी गटात कैलास गावडे यांना 11832 मते, निलेश टिळेकर यांना 11563 मते तर सतीश देवकाते यांना 11,261 मते मिळाली.
नितीन काटे यांना 5434 मते मिळाली. तसेच इतर मागास प्रवर्ग मतदार संघातून तानाजी शिंदे यांना ११३५८ मते तर विरोधी संदीप बनकर यांना 5166 मते मिळाली. तसेच भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून योगेश पाटील यांना 11,843 मते मिळाली तर त्यांना पाठिंबा दिलेले उमेदवार तुकाराम काळे यांना 4172 मते मिळाली. ब प्रवर्ग मतदार संघातून अशोक संभाजीराव पाटील यांना 160 मते मिळाली तर त्यांना पाठिंबा दिलेल्या सत्यजित भाऊसाहेब सपकाळ यांना सोळा मते मिळाली. यामुळे पॅनलने मोठा विजय मिळवला आहे.
ही निवडणूक अतिशय ऐतिहासिक राहिली. कारखाना आर्थिक अडचणीच्या काळात असताना सभासदांनी हा कारखाना सुरक्षितता द्यावा असे आवाहन सुरुवातीपासून करण्यात आले इंदापूर तालुक्यात विरोधकांनी निकराची झुंज दिली मात्र बारामती तालुक्यात विरोधकांचा सुपडा साफ झाला. एकूणच बारामती व इंदापूर तालुक्याच्या 53 गावात जय भवानी माता पॅनलला एकत्रित मतदान मिळत राहिले. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून शेवटपर्यंत ही आघाडी कायम राहिली. या निवडणुकीत करणसिंह घोलप यांनी छत्रपती बचाव पॅनल कडून सर्वाधिक मते घेतली. त्यांचा अपवाद वगळता इतर कोणीही जय भवानीमाता पॅनलला आव्हान देऊ शकला नाही.