ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करा : डॉ. नीलम गोऱ्हे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

मुंबई ः ऊसतोड कामगार महामंडळ कार्यरत असल्याने सामाजिक न्याय विभागाने ऊसतोड कामगार महामंडळ आणि अन्य संबंधित विभागांच्या सहकार्याने सामाजिक न्यायमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियाप्रकरणी गठीत समितीचा अहवाल शासनास सादर करण्यात आला. त्याअनुषंगाने मंत्रालयीन विभागाने केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी बुधवारी पुन्हा बैठक आयोजित करण्यात आली होती.  त्यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे निर्देश दिले.

ऊसतोड कामगारांसाठीच्या या टास्क फोर्सच्या स्थापनेमुळे ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्यास गती मिळेल, असा विश्वास गोऱ्हे यांनी व्यक्त केला आहे. तसेच, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या व समिती अहवालाच्याअनुषंगाने कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

पुणे जिल्ह्यातील दौंड परिसरात एक मृत अर्भक आणि सात ते आठ अर्भकांचे अवयव बाटलीत सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेने अवैध गर्भपात आणि स्त्री-भ्रूणहत्येच्या संभाव्य प्रकरणांकडे लक्ष वेधले असून डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »