‘कृष्णा’ कारखान्याच्या निवडणुकीत रंगत; उमेदवारी मागे घेण्याच्या सत्रात चौघांची माघार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

राड: यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. सोमवारी विविध गटांतील चार उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे आता निवडणूक रिंगणात ११८ उमेदवार शिल्लक राहिले आहेत.

यामध्ये वडगाव हवेली-दुशेरे गटातून महेश रघूनाथ खबालेहनुमंत शिवाजी पाटील, वाठार गटातून प्रमोद मारुती पाटील, आणि इतर मागास प्रवर्ग राखीव गटातून चंद्रकांत जोती कुंभार यांनी माघार घेतली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांनी सांगितले की, अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ९ जून पर्यंत असून, रोज सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवार स्वतः किंवा सूचकाद्वारे अर्ज मागे घेऊ शकतात. सुरुवातीला १३९ अर्ज आले होते, त्यापैकी छाननीनंतर १२२ वैध राहिले होते, आता ही संख्या ११८ वर आली असून आगामी काळात आणखी माघार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »