ई-20 पेट्रोलबाबत निर्णय नाही; केंद्र सरकारचा खुलासा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नवी दिल्ली : देशात सध्या ई-20 किंवा ई-10 पेट्रोल तात्काळ सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. प्रीमियम पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्याबाबतही अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.

सरकारकडून सांगण्यात आले की, पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवण्याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू असली तरी त्यासाठी आवश्यक तांत्रिक, आर्थिक आणि वाहनांवरील परिणामांचा सखोल अभ्यास करण्यात येत आहे. वाहन उत्पादक, तेल कंपन्या आणि संबंधित तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल.

ई-20 बाबत कोणत्याही प्रकारच्या तक्रारी सरकारकडे प्राप्त झालेल्या नाहीत. तसेच वाहनांच्या कार्यक्षमतेवर किंवा ग्राहकांवर त्याचा नकारात्मक परिणाम होणार नाही, याची खात्री झाल्यानंतरच पुढील अंमलबजावणी केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, पेट्रोलचे विविध प्रकार उपलब्ध असून ई-0 (इथेनॉलमुक्त), ई-10 (१० टक्के इथेनॉल मिश्रित) आणि ई-20 (२० टक्के इथेनॉल मिश्रित) असे त्यांचे वर्गीकरण आहे. सध्या देशात मोठ्या प्रमाणावर ई-10 पेट्रोलचा वापर होत असून प्रीमियम पेट्रोल वेगळ्या पंपांवर उपलब्ध आहे.

सरकारचा भर पर्यावरणपूरक इंधन वापरावर असून भविष्यात टप्प्याटप्प्याने इथेनॉल मिश्रण वाढवण्याचा विचार केला जाईल.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »