साखर उत्पादनात अल्प वाढ : महाराष्ट्र आघाडीवरच

‘इस्मा’कडून आकडेवारी जाहीर
नवी दिल्ली – ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत भारताचे साखर उत्पादन किरकोळ वाढून 47.9 लाख टन झाले आहे, असे साखर उत्पादकांची संस्था ISMA ने (इस्मा) म्हटले आहे. साखर विपणन वर्ष ऑक्टोबर ते सप्टेंबर असे चालते.
एका निवेदनात, इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) ने म्हटले आहे की चालू 2022-23 विपणन वर्षात 30 नोव्हेंबरपर्यंत साखरेचे उत्पादन 47.9 लाख टन होते जे मागील वर्षीच्या याच कालावधीत 47.2 लाख टन होते.
मागील वर्षी याच तारखेला कार्यरत असलेल्या 416 कारखान्यांच्या तुलनेत कार्यरत कारखान्यांची संख्याही 434 इतकी जास्त होती, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
ISMA च्या आकडेवारीनुसार, 2022-23 च्या पहिल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन 20 लाख टन झाले, जे 20.3 लाख टन होते. उत्तर प्रदेशात साखरेचे उत्पादन १०.४ लाख टनांवरून ११.२ लाख टन झाले.
कर्नाटकातील साखरेचे उत्पादन १२.८ लाख टनांवरून १२.१ लाख टनांवर आले.
इथेनॉलबाबत ISMA ने सांगितले, की OMCs (भारतीय पेट्रोलियम कंपन्या) नी ESY (इथेनॉल पुरवठा वर्ष) 2022-23 मध्ये पुरवठ्यासाठी आतापर्यंत सुमारे 460 कोटी लिटर इथेनॉलची मागणी नोंदवली आहे. इथेनॉल वर्ष डिसेंबर ते पुढील वर्षी नोव्हेंबर असे गृहित धरलेले आहे.
पेट्रोलियम कंपन्यांनी तिसरे मागणीपत्रही जारी केले आहे. त्यात १३९ कोटी लिटरची मागणी केली आहे. मात्र पुरवठादारांबाबत अंतर्गत छाननी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यावर वितरण सूत्र समजू शकेल, अशी माहिती इस्माच्या अधिकाऱ्यांनी दिली. या तिसऱ्या कोट्यासाठी कारखान्यांना त्यांच्या निविदा पाठवण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर होती.
चालू 2022-23 साखर हंगामात (ऑक्टोबर-सप्टेंबर) भारतातील साखरेचे उत्पादन 30 नोव्हेंबरपर्यंत वर्षापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत सुमारे 1.5 टक्क्यांनी जास्त आहे.
महाराष्ट्र आघाडीवरच
उत्तर प्रदेशात, 104 कार्यरत साखर कारखान्यांनी 11.2 लीटर साखरेचे उत्पादन केले आहे, तर उत्पादन आघाडीवर महाराष्ट्राचे वर्चस्व कायम आहे. या हंगामात महाराष्ट्रात 173 कार्यरत साखर कारखान्यांनी एकत्रितपणे 20 लाख टन, तर कर्नाटकातील 70 कारखान्यांनी 12.1 लीटर साखरेचे उत्पादन केले आहे.
ऑक्टोबर 2022 मध्ये प्राप्त केलेल्या उपग्रह प्रतिमांच्या आधारे, ISMA ने अंदाजे ऊसाखालील एकूण एकरी क्षेत्र सुमारे 59 लाख हेक्टर असेल, जे 2021-22 मधील 56 लाख हेक्टरपेक्षा 6 टक्के जास्त आहे.
यंदाचा साखर हंगाम पुढील वर्षी मार्चपर्यंत चालण्याचा अंदाज आहे. तोपर्यंत साखरेचे किती उत्पादन होते आणि किती साखर इथेनॉलकडे वळवली जाते, हे स्पष्ट होणार नाही.