ऊस म्हणतात मला!
रविवारची साखर कविता
अहो, मराठीत म्हणतात मला ऊस ।
त्यासाठी कारखाने करतीधुसफूस ।।
अरे गुजरातीत म्हणतात शेरडी ।
त्यावर सरकारची नजर करडी ।।
संस्कृतात म्हणतात इक्षुदंड ।
दरासाठी संघटना करती बंड ।।
हिंदीत मलाच म्हणतात गन्ना ।
मालक किसान होईल शेठधन्ना ।।
यापासून तयार होई गुळ साखर।
मळी, मद्य , स्पिरीट आणि पेपर ।।
कारखानदार घेई ऊस शेतकऱ्यांचा।
अन सगळा फायदा घेई इथेनॉलचा ।।
रचनाकार: आहेर वा. र. नासिक
9958782982