Tag sugar news

उसाच्या ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू, एक गंभीर

देवदर्शनाला निघालेल्या तरुणांवर काळाचा घाला जातेगाव (बीड): अमावस्येनिमित्त मारुतीच्या दर्शनासाठी दुचाकीवरून निघालेल्या दोन तरुणांना उसाच्या ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार झाला असून, दुसरा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात गेवराई तालुक्यातील जातेगाव फाटा येथे…

ऊस दरासाठी रास्ता रोको; सांगोल्यात ४५ शेतकऱ्यांवर गुन्हा

सांगोला :  तालुक्यातील ‘धाराशिव’ युनिट ४ (वाकी-शिवणे) साखर कारखान्याने उसाला प्रतिटन ३ हजार रुपये दर द्यावा, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह सुमारे ६० शेतकऱ्यांवर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे…

कोल्हापूर-सांगलीत उसाच्या वजनात घट; एकरी ५ ते ७ टनांचा फटका

sugarcane farm

सततच्या पावसाचा परिणाम कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत यंदा सततच्या पावसामुळे उसाची वाढ खुंटली असून, त्याचा थेट परिणाम वजनावर झाला आहे. एरव्ही ऊस उत्पादनात अग्रेसर असलेल्या या पट्ट्यात यंदा शेतकऱ्यांना प्रति एकरी ५ ते ७ टनांची घट सोसावी लागत आहे.…

श्री छत्रपती कारखाना देणार उसाला प्रतिटन सरसकट १०० रुपये अनुदान

Chatrapati SSK

बारामती : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार, दिनांक १६ जानेवारीपासून कारखान्यात गाळपासाठी येणाऱ्या सर्व प्रकारच्या (आडसाली, सुरू, पूर्व हंगामी आणि खोडवा) उसाला प्रतिटन सरसकट १०० रुपये अनुदान जाहीर करण्यात आले आहे. या निर्णयाची…

मंडलिक कारखान्याकडून २४ कोटींची ऊस बिले जमा

Mandlik sugar result

मुरगूड: कागल तालुक्यातील हमीदवाडा येथील ‘लोकनेते सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याने’ चालू हंगामातील ऊस बिलांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे. १ ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत गाळपास आलेल्या उसासाठी प्रति टन ३,४१० रुपये दराने एकूण २४ कोटी ३ लाख २० हजार ६३१ रुपये जमा करण्यात…

भीमा-पाटस कारखान्याचा मोठा निर्णय : प्रति टन २०० रुपये अतिरिक्त अनुदान

Bhima Patas Sugar

कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांची माहिती पुणे : दौंड तालुक्यातील ‘एम.आर.एन. भीमा शुगर अँड पॉवर’ (निराणी शुगर्स लि.) कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. गळीत हंगाम २०२५-२६ अंतर्गत १६ जानेवारी २०२६ पासून कारखान्याला पुरवठा केल्या जाणाऱ्या उसाला प्रति टन २०० रुपये…

सावधान! कारखान्यांनी कचरा पाण्यात सोडल्यास खैर नाही

लोकायुक्तांचे कडक निर्देश; कचरा विल्हेवाटीचे नियम लागू मुंबई : साखर कारखान्यांमधून बाहेर पडणारा रासायनिक कचरा (केमिकल वेस्ट) शेतजमीन किंवा पाण्याच्या स्त्रोतांमध्ये सोडता कामा नये, असे स्पष्ट निर्देश लोकायुक्त विद्याधर कानडे यांनी दिले आहेत. रासायनिक कारखान्यांप्रमाणेच साखर कारखान्यांनाही कचरा विल्हेवाटीचे नियम…

अतिउत्साही संचालकांना अजित पवारांचा कडक इशारा

AJIT PAWAR

बारामती : सहकारी साखर कारखान्यांमधील वाढत्या अंतर्गत राजकारणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संचालकांचे कान टोचले आहेत. “कारखान्याचे अधिकारी हे आपले सालगडी नाहीत, हे संचालकांनी लक्षात ठेवावे,” अशा कडक शब्दांत पवारांनी माळेगावसह इतर कारखान्यांमधील अतिउत्साही संचालकांना तंबी दिली आहे. दरम्यान, या…

साखर निर्यात सुरू असूनही दरात घसरण; साखर उद्योग आर्थिक कोंडीत

sugar PRODUCTION

पुणे : देशात २०२५-२६ चा ऊस गाळप हंगाम वेगाने सुरू असतानाच साखर उद्योगासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. केंद्र सरकारकडून प्रलंबित प्रश्नांवर अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने आणि साखरेच्या दरात मोठी घसरण झाल्याने कारखानदारांची चिंता वाढली आहे. राष्ट्रीय सहकारी साखर…

पुणे जिल्‍ह्यातील पारगावमध्ये एका उसाला तब्बल ४३ कांडे

जुन्नर (पुणे ) : जुन्नर तालुक्यातील पारगावतर्फे आळे येथील प्रगतशील शेतकरी विक्रम तट्टू यांनी ऊस शेतीत नवा आदर्श निर्माण केला आहे. आपल्या ३ एकर शेतात त्यांनी ८६०३२ जातीच्या आडसाली उसाचे भरघोस उत्पादन घेतले असून, एका उसाची लांबी तब्बल ४३ कांड्यांपर्यंत पोहोचली…

Select Language »