ट्वेंटी वन शुगर्सचा बॉयलर प्रदीपन सोहळा

मांजरा परिवारातील ट्वेंटी वन शुगर्स लिमिटेड (युनिट १) कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते मळवटी येथे झाला.

यावेळी ‘ट्वेंटी वन शुगर्स’चे संस्थापक-अध्यक्ष तथा लातूरचे माजी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, आमदार धीरज विलासराव देशमुख आदी उपस्थित होते .

शेतकऱ्यांचे हित हे मांजरा परिवाराचे ध्येय आहे. हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने मांजरा परिवार मागील सर्व हंगामाप्रमाणेच हा हंगामही यशस्वीपणे पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी शेतकरी, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांना चालू गळीत हंगामाच्या शुभेच्छा दिल्या.