|| पाऊले चालती पंढरीची वाट ||

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आठव  येई आषाढी कार्तिकीला
जाऊ पंढरीस विठ्ठल भेटीला
वारक-यांचा दिंडीमेळा निघाला
एका गावाहून दुसऱ्या गावाला||१||

घेतली फडकी धुडकी साथीला
टोपी उपरणे धोतर जोडीला
मस्तकी चंदनाचा टिळा लावला
कोरडा शिधा फडशीत भरला||२||

दिंड्या पताकांचा मेळा वैष्णवांचा
गजर होई ज्ञानोबा तुकोबाचा
नसे भेदाभेद  झेंडा समतेचा
जयघोष विठ्ठल रखुमाईचा||३||

सर्वा ठायी विचार विठूरायाचा
समतेचा,विश्वचि माझे घराचा
दीन दुबळ्यास म्हणे जो आपुले
सकळ जन वंदा त्याची पाऊले||४||

चंद्रभागेच्या वाळवंटी किर्तन
ऐका टाळमृदंग, वीणा वादन
पांडुरंगाचे झाले मुखदर्शन
वारीचे फळ ,भेटले भगवान||५||

कवी: इंजिनिअर वाळू आहेर, नाशिक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »