वाऱ्यावरची वरात

आवडल्यास ही बातमी शेअर करा

जांभळीच्या झाडाला बांधला सणाला  झोका|
डोळ्याला दिसतंय नशीब देईल धोका ||
नंदी दुध प्यायला, अशी उठली आवई|
भलेभले बहकले,ती होती कोल्हेकुई||१||

आकाशात ढग येईना ,पाऊस पडेना|
मोर नाचू म्हणतो, पण लांडोर दिसेना||
खुप शिकला म्हणे, पण साहेब होईना|
वय झाले आता,पोरगी कुणीही देईना||२||

शिक्षण सेवक झाले नवे वेठबिगार |
काही केल्यागावी मिळेना कुठे रोजगार||
अंनिससाठीच बळी गेले दाभोलकर|
कलबुर्गी, पानसरेंचे खुनीच फरार||३||

मशिदी खाली शिवपिंडी लागल्या सापडू|
मजारीला चादरी लागल्यांय कमी पडू||
दोन शुन्यांची बेरीज नेहमी मोठं शुन्य|
पन्नास कोटींच्या स्नानाने महाकुंभ धन्य||४||

आला आता उन्हाळा, चला जाऊ फिरायला|
कुलू मनालीला, पहेलगाम काश्मीरला||
तिथे  झाली ना दैना, दहशतवादाने कहर केला |
सरकार लागले उठाबशा काढायला||५||

घाल घाल पिंगा, ईश्वरा माझ्या परसात |
देव कृपेने होऊ द्या प्रेमाची बरसात ||
द्या हाकारे ,वाजवा नगारे,आली वरात |
देवा सद्बुद्धी द्या,भरा सुखाची परात||६||


वाळू रघुनाथ आहेर, नाशिक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »