केंद्र सरकारने हार्वेस्टरसाठी अनुदान द्यावे : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

एक ऑक्टोबरपासून गाळप हंगाम
राज्यातील उसाचे जास्तीत जास्त गाळप व्हावे, यासाठी या वर्षी येत्या एक ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी गुरुवारी केली.
या कृषी प्रदर्शनात १०० पेक्षा जास्त कंपन्यांचा सहभाग असेल. पशुपक्षी प्राणी प्रदर्शन,प्रि फॅब्रिकेटेड स्टॉल्स, वैविध्यपूर्ण अवजारे तसेच महिला बचत गटांकरिता स्टॉल मोफत असणार आहेत, अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली.
पुण्यात साखर आयुक्तालयात गाळप हंगामाची आढावा बैठक त्यांनी घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. पाटील म्हणाले, ‘ पुढील वर्षी उसाचे क्षेत्र किती राहील, याची माहिती घेत आहोत. त्यामुळे आगामी काळात ऊस नोंदणीसाठी अॅप तयार करण्यात येणार आहे. त्याचा वापर करण्याचे आवाहन कारखान्यांना केले आहे. ई-पीक पाहणीद्वारे अनेक ठिकाणी सातबाऱ्याची नोंद होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या हंगामात ‘हार्वेस्टर’चे महत्त्व लक्षात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक हार्वेस्टर मराठवाड्यात पाठविण्यात आले आहे. अनेक कारखान्यांना आम्ही हार्वेस्टर घेण्याच्या सूचना केल्या आहेत.’ केंद्र सरकारने हार्वेस्टरसाठी अनुदान द्यावे, अशी मागणी करणार आहोत. राज्य सरकारकडे सगळ्याच गोष्टी मागत नाही. कारखानदारीला हातभार लावावा यासाठी सरकार सकारात्मक भूमिका घेत आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
……………
ब्राझीलपेक्षा भारतातच उत्पादन अधिक
ब्राझीलमध्ये गाळपाचा हंगाम सुरू झाला आहे. तेथे तीन हंगाम असतात. त्यापैकी दोन हंगाम सुरू झाले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत ब्राझीलने ३३० लाख टन एवढी साखर उत्पादन केल्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर आकडे जाहीर करण्यात आले आहेत. देशात आजमितीला ३५७ लाख टन उत्पादन झाले आहे. तिसऱ्या हंगामात ब्राझीलकडून इथेनॉलच्या निर्मितीवर भर देण्यात येत असल्याने भारताच्या उत्पादनाची आकडेवारी ब्राझील पार करू शकणार नाही, असा विश्वास साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला.
……………