पुण्यात 4, 5 जून रोजी होणार राज्यस्तरीय साखर परिषद

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे – वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, साखर आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ आणि वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशनच्या वतीने चार व पाच जून रोजी राज्यस्तरीय साखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी साखर उद्योगातील सर्वोत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे.

मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे ही परिषद आहे. ‘साखर उद्योगासमोरील समस्या, त्यावरील उपाययोजना आणि भविष्यातील आव्हाने’ या विषयावर परिषदेत चर्चा होणार आहे, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

परिषदेसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सहकार सचिव ज्ञानेश कुमार यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. परिषदेचे अध्यक्षपद माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे भूषविणार आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »