आदि (आद्य) शंकराचार्य

आज मंगळवार, एप्रिल २१, २०२६ युगाब्द : ५१२८
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर वैशाख ०१, शके १९४८
सूर्योदय : ०६:१७ सूर्यास्त : १८:५८
चंद्रोदय : ०९:२८ चंद्रास्त : २३:१९
शक : १९४८
संवत्सर : पराभव
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : वैशाख
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : पञ्चमी – ०१:१९, एप्रिल २२ पर्यंत
नक्षत्र : मृगशीर्ष – २३:५८ पर्यंत
योग : शोभन – १२:३१ पर्यंत
करण : बव – १४:४४ पर्यंत
द्वितीय करण : बालव – ०१:१९, एप्रिल २२ पर्यंत
सूर्य राशि : मेष
चंद्र राशि : वृषभ – १३:०० पर्यंत
राहुकाल : १५:४७ ते १७:२३
गुलिक काल : १२:३७ ते १४:१२
यमगण्ड : ०९:२७ ते ११:०२
अभिजित मुहूर्त : १२:१२ ते १३:०३
दुर्मुहूर्त : ८:४९ ते ०९:४०
दुर्मुहूर्त : २३:२९ ते ००:१४, एप्रिल २२
अमृत काल : १५:५८ ते १७:२५
वर्ज्य : ०७:१४ ते ०८:४१
आदि ( आद्य ) शंकराचार्य हे अद्वैत वेदान्तमताचे उद्गाते व भारतीय हिंदू धर्मीयांचे तत्त्वज्ञ होते. त्यांनी अणुवादास खोडून काढत अद्वैताचा पुरस्कार केला. इ.स.च्या आठव्या-नवव्या शतकात कन्याकुमारी ते काश्मीर, आणि द्वारका ते जगन्नाथपुरी असे सर्व भारतभर भ्रमण करून, त्यांनी हिंदू धर्माची पुर्न:स्थापना केली.
शंकराचार्य हे हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्य मानले जातात. आद्य शंकराचार्यांनी द्वारका, जगन्नाथपुरी, शृंगेरी आणि बद्रीकेदार येथे चार पीठे निर्मून, त्यांवर प्रत्येकी एक पीठासीन शंकराचार्य नेमून आचार्य परंपरा घालून दिली.
या आदि शंकराचार्यांनी प्रस्थानत्रयींवर (वेद, उपनिषदे व भगवद्गीता) आणि अन्य विषयांवर अनेक भाष्यग्रंथ लिहिले आहेत. त्यांनी तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ, संस्कृत स्तोत्रे, आणि तत्सम काव्ये रचली आहेत. त्यांच्या अनेक पद्यरचना अनुप्रासादी काव्यालंकारांनी ओथंबलेल्या आहेत.
७८८: आदि शंकराचार्य यांचा जन्म. ( तिथी नुसार )
गणितज्ञ शकुंतला देवी १९४४ मध्ये लंडनला गेल्या. लंडनला गेल्यावर पुढे त्यांनी संपूर्ण जगामध्ये प्रवास केला आणि आपल्या बुद्धीमत्ता आणि गणितीय कौशल्याचे वेगवेगळे चमत्कार त्यांनी संपूर्ण जगाला चक्रावून सोडले. १९७६ साली आपल्या अमेरिका दौऱ्यात त्यांनी संगणकापेक्षाही अधिक वेगाने आकडेमोड पूर्ण करून त्याची उत्तरे परिक्षकांसमोर अचूक सादर केली.
१९८२ साली थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्यांच्या बुद्धिमत्तेची दखल घेतली. या कामगिरीचे वर्णन करताना असे वर्णन केले गेले आहे की १९८० मध्ये शकुंतला देवी यांनी संगणकालाही पराभूत करण्याची किमया करून दाखवली. ती घटना पुढीलप्रमाणे-
१८ जून १९८० मध्ये त्यांना 7,686,369,774,870 आणि 2,465,099,745,779 ह्या दोन संख्या गुणाकारासाठी देण्यात आल्या. हे आकडे लंडनच्या इम्पिरियल कॉलेजच्या संगणक विभागाने निवडले. त्यानंतर त्यांनी या दोन आकड्यांचा अचूक गुणाकार करून दाखवत केवळ २८ सेकंदामध्ये 18,947,668,177,995,426,462,773,730 हे उत्तर दिलं !
विचार करा १३ आकडी दोन संख्याचा गुणाकार त्यांनी फक्त २८ सेकंदात पूर्ण केला. त्यांच्या याच कामगिरीमुळे त्यांना ह्युमन कॉम्प्युटर म्हणून ओळखले जाऊ लागले आणि शकुंतला देवी यांच नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये विराजमान झालं.
भारतात परतल्यावर १९८८ मध्ये त्यांना अमेरिकेतून बर्कलेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठामधील मानसशास्त्र विभागाचं विशेष आमंत्रण आलं. या विभागातील प्राध्यापक आर्थर जेनसन यांनी त्यांच्यावर संशोधन करण्यास सुरुवात केली.
१९९० सालच्या इंटेलिजन्स या प्रसिद्ध जर्नलमध्ये प्राध्यापक आर्थर जेन्सन यांनी शकुंतला देवी यांच्याविषयीचा तपशीलवार प्रबंध प्रकाशित केला. प्राध्यापक जेन्सन यांनी देखील त्यांच्यावर असंख्य प्रयोग केले. कोणत्याही अवघड बहुअंकी संख्येचं धनमूळ काढणे किंवा कोणत्याही बहुअंकी संख्येचा सातवा किंवा आठवा घात काढायला सांगण्याची खोटी की शकुंतला देवी याचं उत्तर हजर असायचं.
जेन्सन यांनी आपल्या नोंदीत असं नमूद केलंय की, – मी पूर्ण आकडा लिहिण्यापूर्वीच त्या सांगितलेलं गणित झटक्यात सोडवायच्या.
आपल्या गणितीय प्रतिभेविषयी शकुंतला देवींनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. त्यामध्ये फलज्योतिष, पाककला आणि काही कादंबऱ्याचा देखील समावेश आहे.
१९२९: ह्युमन कॉम्प्युटर :गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला शकुंतलादेवी यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल २०१३)
गुंथर सोंथायमर – हे भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील लोकधर्म, लोकसंस्कृती, लोकदैवते, धर्मशास्त्र ह्या विषयांचा अभ्यास करणारे अभ्यासक आणि त्यांविषयी संशोधन करणारे संशोधक होते. दक्षिण भारतातील पशुपालक समाजाच्या धर्मश्रद्धांचा त्यांनी विशेष अभ्यास केला होता.
गुंथर ह्यांचा जन्म डॉइच्लांटमधील (जर्मनी) दोनाऊ नदीकाठच्या उल्म ह्या गावी झाला. त्यांचे वडील डॉ. वॉल्टर सोंथायमर हे स्टुट्गार्ट येथे एका शाळेचे मुख्याध्यापक होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सोंथायमर कुटुंबाने गुंथर ह्यांच्या आई हेर्मा डीट्स-सोंथायमर ह्याच्या माहेरी ब्रॉम्बर्ग येथे स्थलांतर केले. तिथेच गुंथर ह्यांचे प्राथमिक शिक्षण झाले.
१९४५नंतर गुंथर ह्यांचे पुढील शिक्षण स्टुटगार्ट येथील एबरहार्ड-लुडविग्स-ग्युम्नासीयुममध्ये झाले. १९५३मध्ये त्यांनी तिथूनच आबीटुअर ही पदवी मिळवली.
विद्यार्थिदशेपासूनच गुंथर हे स्टुटगार्ट येथील इंडो-जर्मन-सोसायटीच्या कामात सक्रिय सहभागी असत. त्यांनी काही काळ ह्या संस्थेचे सचिवपदही भूषवले. भारतीय मजलीस ह्या डॉइच्लांटमधील (जर्मनी) पहिल्या भारतीय-विद्यार्थि-संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैकी गुंथर हे एक सदस्य होते.
गुंथर ह्यांना पुढील शिक्षणासाठी भारतविद्या (इंडॉलॉजी) हा विषय घेण्याची इच्छा होती. परंतु हा विषय घेतल्यास फारशा व्यावसायिक संधी उपलब्ध नाहीत असे त्यांच्या वडिलांचे मत पडल्याने गुंथर ह्यांनी विधि (कायदा) ह्या विषयाची पहिली राज्यस्तरीय परीक्षा दिली आणि १९५७मध्ये ते ही परीक्षा उत्तीर्ण झाले.
१९३४: महाराष्ट्र लोकधर्म मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक डॉ. गुंथर सोन्थायमर यांचा जन्म. (मृत्यू : २ जून १९९२)
- घटना :
१९६०: रिओ दि जानेरो ह्या ब्राझील देशाच्या राजधानी चे उद्घाटन झाले.
१९७२: अपोलो-१६ या अमेरिकन अंतराळयानातून गेलेले जॉन यंग आणि चार्ल्स ड्युक हे अंतराळवीर चंद्रावर उतरले.
१९९७: भारताचे १२ वे पंतप्रधान म्हणून डॉ. इंद्रकुमार गुजराल यांनी सूत्रे हाती घेतली.
२०००: आई-वडिलांच्या संपत्तीत परावलंबी विधवेलाही अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमलात आणला.
२०१९ : श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये ईस्टर संडे साजरा होत असताना शहरातील चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत २०० जणांचा मृत्यू झाला असून, ४०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. यात ३५ विदेशी पर्यटकांचा समावेशही आहे. दरम्यान, सकाळी ६ स्फोट झाल्यानंतर सुमारे ५ तासांनंतर आणखी दोन स्फोट घडवण्यात आल्याची माहिती कोलंबो पोलिसांनी दिली.
मृत्यू :
●१९९५ : वनवासी कल्याण आश्रमाचे संस्थापक वनयोगी बाळासाहेब देशपांडे यांचे निधन ( जन्म : २६ डिसेंबर, १९१३ )
- जन्म :
१८९६: स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक केशवराव मारुतराव जेधे यांचा जन्म. (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९५९ )
१९४५: पद्म श्री पुरस्कार सन्मानित भारतीय क्रिकेटपटू आणि अंपायर श्रीनिवासराघवन वेंकटराघवन यांचा जन्म.
१९५०: हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेते शिवाजी साटम यांचा जन्म.






