उसासाठी AI : खालील मुद्दे गांभीर्याने विचारात घ्या…

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI चा ऊस शेतीसाठी वापराबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने यासाठी पुढाकार घेतला असून, बारामतीतमध्ये नव्या ऊस पद्धतीचे यशस्वी प्रयोग केले आहेत. कृषी क्षेत्रात अनेक वर्षांपासून काम करणारे सतीश देशमुख यांनी या प्रयोगांना भेट देऊन आपली निरीक्षणे मांडली आहेत… या लेखाला ज्येष्ठ साखर उद्योग विश्लेषक पी. जी. मेढे यांनी मुद्देसूद उत्तर दिले आहे…

देशमुख साहेब,

सप्रेम नमस्कार!

P G Medhe

आपण मांडलेले मुद्दे नक्कीच महत्त्वाचे आहेत. मात्र, याचा अर्थ असा नाही की हे प्रश्न सुटू शकत नाहीत. जर नव्या पद्धतींची अंमलबजावणी करण्यापूर्वी योग्य नियोजन केले, तर त्यावर निश्चित तोडगा निघू शकतो. नव्या यंत्रणा किंवा तंत्रज्ञान लागू करताना अडचणी येणारच, पण प्रत्येक समस्येचं एक समाधान असतंच. आणि हेच समाधान जर सापडलं, तर ती पुढची वाटचाल ठरणार आहे.

पी. जी. मेढे

त्यामुळे, ऊस उत्पादनात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरण्यासाठी खालील मुद्दे गांभीर्याने विचारात घेणे आवश्यक आहे.

ऊस शेतीतील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) – शाश्वत वाढीसाठी एक धोरणात्मक आराखडा


भारतातील ऊस शेतीला आधुनिक, कार्यक्षम आणि टिकाऊ बनवण्याची क्षमता कृत्रिम बुद्धिमत्तेत आहे. मात्र, तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत AI पोहोचवताना अनेक व्यवहारिक, सामाजिक-आर्थिक आणि पायाभूत सुविधांचे अडथळे आहेत. हे अडथळे दूर करण्यासाठी धोरण, सहकारी संस्था, आर्थिक पाठबळ आणि शाश्वत प्रशिक्षण या सर्वांचा समन्वय आवश्यक आहे.

ऊस शेतीमध्ये AI अंमलबजावणीतील अडथळे:

  • विखुरलेल्या जमिनी: लहान व विखुरलेल्या शेतजमिनींमुळे ड्रोन, सेन्सर, सॅटेलाईट मॅपिंग यांसारखी AI प्रणाली प्रभावीपणे लागू करणे कठीण जाते.
  • AI विषयी जागरूकतेचा अभाव: शेतकऱ्यांना AI च्या वापराविषयी माहिती किंवा त्याचे फायदे समजत नाहीत.
  • तंत्रज्ञानाचा उच्च प्रारंभिक खर्च: ड्रोन, IoT सेन्सर्स व सॉफ्टवेअर हे लहान शेतकऱ्यांसाठी परवडणारे नाहीत.
  • इंटरनेट व वीज समस्यांमुळे अडथळे: ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी अजूनही अपुरी आहे.
  • संस्थात्मक पाठबळाचा अभाव: स्थानिक बँका, ग्रामपंचायती व सहकारी संस्थांचा सहभाग फारसा नाही.

व्यापक उपाययोजना – धोरणात्मक चौकट

१. गावपातळीवरील सामुदायिक शेतीसाठी धोरण

उद्देश – सामुदायिक आणि सहकारी शेतीच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात AI अंमलबजावणी सुलभ करणे.

कृती कार्यक्रम

  • FPOs आणि ऊस उत्पादक सहकारी संस्था स्थापन कराव्यात.
  • “मॉडेल गाव योजना” राबवून गावकऱ्यांना आर्थिक सहकार्याद्वारे समान पीक पद्धती व AI साधनांचा सामायिक वापरासाठी प्रोत्साहन द्यावे.

२. AI-संलग्न ड्रिप सिंचन राष्ट्रीय कार्यक्रम

उद्देश : AI आधारित हवामान अंदाज आणि जमीन ओलावा विश्लेषण पद्धत आणि सूक्ष्म सिंचन पद्धत यांची सांगड घालणे.

कृती कार्यक्रम

  • “स्मार्ट ड्रिप फॉर स्मार्ट केन” नावाने विशेष योजना PMKSY अंतर्गत राबवावी.
  • हवामान अंदाज, मातीतील आर्द्रता सेन्सरच्या मदतीने सिंचनाचे वेळापत्रक निश्चित करणे.

३. NCDC व इतर संस्थांतर्फे माफक दराने वित्तपुरवठा

उद्देश : FPOs व सहकारी साखर कारखान्यांना AI साठी भांडवली सहाय्य उपलब्ध करून देणे.

कृती कार्यक्रम

  • NCDC, NABARD, SIDBI यांच्याकडून AI आणि प्रीसिसन फार्मिंग सामुग्रीसाठी विशेष कर्ज योजना राबवावी.
  • नोंदणीकृत FPO आणि सहकारी संस्थांना, AI अंमलबजावणीसाठी ० ते ३ टक्के दराने कर्जपुरवठा
  • केंद्र सरकारकडून AI यंत्रणेसाठी 50% पर्यंत सबसिडी योजना.

४. गाव पातळीवर व्यापक प्रशिक्षण व जनजागृती

उद्देश : AI वापरासाठी शेतकऱ्यांची क्षमताबांधणी आणि डिजिटल साक्षरता वाढवणे.

कृती कार्यक्रम :

  • कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठे आणि स्टार्टअप यांचा सहभाग.
  • तालुकास्तरावर डेमो फील्ड, हेल्पलाईनसह AI प्रशिक्षण हब सुरू करणे.
  • स्थानिक भाषेतील अॅप्स व मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे.

५. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा (DCCBs) सहभाग

उद्देश : ग्रामीण पतपुरवठा व्यवस्थेत AI गुंतवणूक आणणे.

  • DCCB नी AI लोन योजना व टेक क्रेडिट कार्ड्स सुरू करावे.
  • ऊस पुरवठा कराराच्या माध्यमातून इनपुट फाइनान्सिंगची साखर कारखान्यांकडून सुविधा उपलब्ध करून द्यावी.
  • AI आधारित पिकांसाठी बँकांनी गट विमा योजना सुरू करावी.

AI चा समन्वयित वापर – फायदे

  • पीक उत्पादन अंदाज: हवामान, कीड प्रादुर्भाव चक्र व वाढीच्या टप्प्यावर एआय आधारित पूर्व अंदाजांमुळे नियोजन आणि प्रकिया सोपी.
  • स्रोतांचा कार्यक्षम वापर: पाणी, खत व कीड नाशकांचा अतिरिक्त वापर टाळणे एआय डेटा-आधारित निर्णय प्रक्रियामुळे सहज शक्य.
  • कीड/रोग व्यवस्थापन: AI द्वारे वेळेआधीच इशारा मिळत असल्याने व्यवस्थापन आणि निवारण शक्य.
  • देशकांमध्ये पारदर्शकता: उपग्रह व IoT आधारित तंत्रज्ञानमुळे उसांचे वजन सांगता येऊन शकणार आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या देयकांमध्ये पारदर्शकता येणार..
  • हवामान लवचिकता: हवामान बदलाशी जुळवून घेण्याकरिता ऊस वाण, लागवड काळ आणि पिकांवरील ताणाचे एआयमुळे सुलभ व्यवस्थापन.

निष्कर्ष –

संयुक्त प्रयत्नांची आवश्यकता

AI चा ऊस शेतीत प्रभावी वापर करणे हे नक्कीच आव्हानात्मक आहे, पण योग्य धोरणात्मक नियोजन व सामूहिक प्रयत्नांनी हे शक्य आहे. यासाठी धोरण, आर्थिक पाठबळ, तंत्रज्ञान आणि समाज या सर्व घटकांची एकत्रित कृती हवी आहे. संस्थात्मक पाठबळ, प्रशिक्षणे आणि प्रोत्साहनात्मक योजनेद्वारे AI ऊस उद्योगाच्या व्हिजन 2047 चा केंद्रबिंदू ठरू शकतो.

आपणच हे शक्य करू शकतो. योग्य निर्णयाने भविष्यातील शेती अधिक शाश्वत आणि प्रगत होऊ शकते.

(लेखक पी. जी. मेढे : माजी व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना लिमिटेड; साखर उद्योग विश्लेषक, कोल्हापूर)

सतीश देशमुख यांचा लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ऊस शेतीसाठी AI चा वापर करताना सावधान!

(दोन्ही लेख सविस्तर वाचण्यासाठी SugaToday चा मे २०२५ चा अंक मागवून घ्या. त्यासाठी ८९९९७७६७२१ वर व्हॉट्‌सॲप संदेश पाठवा)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »