उसाच्या फडात गांजाची शेती उघड; मुद्देमाल जप्त

आवडल्यास ही बातमी शेअर करा

बीड : जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत ऊसाच्या शेतात लपवून केलेली गांजाची शेती उघडकीस आणली आहे. या कारवाईत सुमारे ४५ लाख २७ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, चकलांबा पोलिसांनी सुकळवाडी शिवारातील एका ऊसाच्या फडावर छापा टाकला. ऊसाच्या पिकामध्ये लपवून मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड करण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सुमारे १२३ झाडे जप्त केली असून त्याचे एकूण वजन अंदाजे १८५.४ किलो आहे.

या प्रकरणी संबंधित शेतमालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध गांजा शेतीवर मोठा आळा बसणार असल्याचे सांगितले जात आहे.

या यशस्वी कारवाईत पोलिस अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा सहभाग होता.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »