ऊसतोड मजुराच्या मुलाची NEET मध्ये चमक; ५८२ गुणांसह यश

आवडल्यास ही बातमी शेअर करा

बीड | प्रतिनिधी

जिद्द, परिश्रम आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देवदरी (ता. शिराळा) येथील ऊसतोड मजुराचा मुलगा ज्ञानेश्वर बडे याने NEET-UG 2026 परीक्षेत ५८२ गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्याची कामगिरी प्रेरणादायी ठरली आहे.

ज्ञानेश्वरने यापूर्वी बारावी विज्ञान शाखेत ८८.६२ टक्के गुण मिळवले होते. त्यानंतर शिक्षणासोबत विविध ठिकाणी काम करून स्वतःच्या शिक्षणाचा खर्च भागवला. आर्थिक अडचणी असूनही त्याने वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न जिवंत ठेवत कठोर परिश्रम घेतले.

त्याच्या वडिलांचे ऊसतोड मजुरीचे काम आणि आईची कष्टमय साथ यामुळे शिक्षणाचा प्रवास सोपा नव्हता. मात्र कुटुंबाच्या पाठबळासह सातत्यपूर्ण अभ्यासामुळे त्याला हे यश मिळाले.

“घरची परिस्थिती अत्यंत कठीण होती. आई-वडिलांच्या कष्टांनीच मला शिक्षण घेता आले. डॉक्टर होऊन समाजाची सेवा करण्याचे माझे स्वप्न आहे,” अशी भावना ज्ञानेश्वर बडेने व्यक्त केली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »