मराठवाड्यातील साखर कारखान्यांसाठी २७ रोजी महत्त्वाची परिषद

छत्रपती संभाजीनगर : सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची परिषद येत्या २७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. ती मराठवाड्यातील साखर कारखान्यांसाठी असून, सकाळी १० वाजता सुरू होईल, अशी माहिती संयोजक टी . एम . झाडे यांनी दिली.
परभणी जिल्ह्यातील पोखर्णी नृसिंह येथे स. १० ते दु. ५ या वेळेत परिषद होईल. मराठवाड्यातील सर्व साखर कारखान्यांनी मिळून परिषदेचे आयोजन केले आहे.
या परिषदेला मराठवाड्यातील सर्व सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांचे ऊस विकास अधिकारी आणि शेतकी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.. ऊस विकासाचे महत्त्व, ऊसतोडणी आणि वाहतुकीचे वेळापत्रक , वाहतुकीतील अडचणी आदी विषयावर यावेळी चर्चा होणार आहे.
या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन मार्ग काढण्यासाठी, तसेच पुढील दिशा ठरवण्यासाठी ही परिषद आहे. कमी कालावधीचा गळीत हंगाम, ऊस वाहतूक आणि तोडणीत होणारी फसवणूक व उपाय आदींवरही परिषदेत चर्चा होणार आहे.
परिषदेचे उद्घाटन पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप, साखर सहसंचालक सचिन रावळ यांच्या उपस्थितीत होणार आहे. जयवंत शुगरचे प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे आणि छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे निवृत्त कार्यकारी संचालक अनंत निकम प्रमुख मार्गदर्शक आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आणि एन. एस. एल. शुगरचे अंबरीश कदम उपस्थित राहतील. या परिषदेला सर्व संबंधितांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक झाडे , व्ही. पी. पवार, बी. डी. सातपुते यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९९२१२०४५२९ वर संपर्क साधावा.