*भारतीय शुगर*च्या सल्लागार मंडळावर मंगेश तिटकारे

साखर उद्योग क्षेत्रातील प्रसिद्ध संस्था ‘भारतीय शुगर’च्या सल्लागार मंडळाच्या सदस्य पदी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय शुगरचे चेअरमन विक्रमसिंह शिंदे यांनी नुकतेच श्री. तिटकारे यांना नेमणूक पत्र प्रदान केले. हे सदस्यत्व सेवाभावी स्वरूपाचे असून सध्या या सल्लागार मंडळामध्ये अनेक नामवंत मंडळींचा समावेश आहे.
भारतीय शुगर ही गेल्या पाच दशकापासून साखर क्षेत्रात कार्यरत असलेली नामवंत संस्था असून तिचे मुख्यालय पुणे येथे आहे.






