‘बिद्री’ची कुस्ती स्पर्धा आता २२ व २३ एप्रिल रोजी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

राष्ट्रीय स्पर्धेमुळे तारीख बदलली : के. पी. पाटील

बिद्री : बिद्री साखर कारखान्याच्याः वतीने दरवर्षी भरविण्यात येणाऱ्या मानधनधारक कुस्ती स्पर्धेच्या तारखेत यंदा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. पूर्वनियोजित २३ व २४ एप्रिलऐवजी आता ही भव्य कुस्ती स्पर्धा बुधवार, दि. २२ व गुरुवार, दि. २३ एप्रिल रोजी पार पडणार आहे.

पुणे येथे त्याच कालावधीत १७वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा होत आहे. राज्यातील अनेक दर्जेदार पैलवानांना दोन्ही स्पर्धांमध्ये सहभागी होता यावे, या उद्देशाने तारखांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार, बुधवार, दि. २२ रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत खेळाडूंची वजन प्रक्रिया पार पडणार असून, सायंकाळी ४ वाजता स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन होईल. त्यानंतर पहिल्या दिवसापासूनच रंगतदार कुस्त्यांचे सामने सुरू होतील.

गुरुवार, दि. २३ रोजीही सायंकाळी थरारक झुंजी रंगणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभरातील नामांकित पैलवानांच्या उपस्थितीत कुस्तीप्रेमींना रोमांचक सामने पाहण्याची संधी मिळणार आहे. बदललेल्या तारखांची सर्व पैलवान, वस्ताद तसेच कुस्तीप्रेमींनी नोंद घ्यावी, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी केले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »