असे कसे हे ट्रम्प राव!

आवडल्यास ही बातमी शेअर करा


  करुया आरती माझ्या तात्या ट्रंपरावा
  अहो राया , अहो राया,  तुम्ही ट्रंप राया |
  अगाध हो तुमची मुजोर अपकिर्ती
असे कसे झाले तुम्ही अविचारी राया||१||
   ‌‌
रोजच वाटते तुमची जगाला धास्ती
कोणीच नाही हो राजी करायला दोस्ती
अरब जगताची तुमच्याकडे चावी
पाटलाच्या डोक्यावर शिकतोय न्हावी||२||

नोबेल मिळवायची झाली तुम्हा घाई
अर्धा कच्चा मध्यस्थी पाकचा बळी जाई
शाळकरी मुले मारली अविचाराने
निरपराध मेले या राजकारणाने||३||

युरोप,नाटो, फ्रान्स मदतीला येईना
अचाट शक्तीचा पुचाट प्रयोग चालू
तीनशे कोटी डॉलरचे क्षेपणास्त्राला
तीनशे डॉलरचा ड्रोणभारी पडला ||४||

तेलाचा झालायं जगभर तुटवडा
महागाईने नेला अटकेपार झेंडा
भारतालाही अमेरिका जेवू देईना
इस्रायल,इराण काही भीक घालेना ||५||

अमेरिकेला धरलं तर चावतंय
इराणला सोडलंय तर  पळतयं
चीन पाक दूरुन दूरून हसतोयं
भारताचे दिवस येतील म्हणतायं||६||


इंजिनिअर कवी -वाळू आहेर , नाशिक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »