बसवेश्वर महाराज जयंती

आज रविवार, एप्रिल १९, २०२६ युगाब्द : ५१२८
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र २९, शके १९४८
सूर्योदय: ०६:१८ सूर्यास्त : १८:५७
चंद्रोदय : ०७:३० चंद्रास्त : २१:०४
शक : १९४८
संवत्सर : पराभव
उत्तरायण
ऋतु : वसंत
चंद्र माह : वैशाख
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : द्वितीया – १०:४९ पर्यंत
नक्षत्र : भरणी – ०७:१० पर्यंत
क्षय नक्षत्र : कृत्तिका – ०४:३५, एप्रिल २० पर्यंत
योग : आयुष्मान् – २०:०२ पर्यंत
करण : कौलव – १०:४९ पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – २१:०७ पर्यंत
सूर्य राशि : मेष
चंद्र राशि : मेष – १२:३१ पर्यंत
राहुकाल : १७:२२ ते १८:५७
गुलिक काल : १५:४७ ते १७:२२
यमगण्ड१ : २:३८ ते १४:१३
अभिजित मुहूर्त : १२:१२ ते १३:०३
दुर्मुहूर्त : १७:१६ ते १८:०६
अमृत काल : ०२:२६, एप्रिल २० ते ०३:५२, एप्रिल २०
वर्ज्य : १७:५२ ते १९:१८
अस्यां तिथौ क्षयमुर्पति हुतं न दत्तं। तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया॥
उद्दिष्य दैवतपितृन्क्रियते मनुष्यैः। तत् च अक्षयं भवति भारत सर्वमेव॥
अक्षय्य तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो.
कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे महत्व विशेष आहे. या दिवसाला आखा तीज असेही म्हटले जाते.
राजस्थानात हा दिवस शुभ मुहूर्त म्हणून साजरा केला जातो. राजस्थानात या दिवसाला आखा तीज असे म्हणतात.
राजस्थानातील शहरी आणि ग्रामीण भागात या दिवशी विवाह करण्याची पद्धती आहे तसेच
प. बंगाल प्रदेशातील व्यापारी वर्गात अक्षय्यतृतीया महत्त्वाचा दिवस मानला जातो. हालकटा या नावाने या दिवशी गणपतीची आणि लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. व्यापारी लोक नव्या हिशोबाच्या वह्या या दिवशी वापरात आणतात. महाविष्णु आणि लक्ष्मी व कुबेर पूजन यांचे महत्त्व या दिवशी असते. मंदिरात दर्शनाला जाणे,अन्नदान करणे असे आचार या दिवशी केले जातात. द. भारतात महाविष्णु आणि लक्ष्मी व कुबेर पूजन यांचे महत्त्व या दिवशी असते.मंदिरात दर्शनाला जाणे,अन्नदान करणे असे आचार या दिवशी केले जातात.
आज अक्षय्य तृतीया आहे.
कर्नाटकाच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक इतिहासात संत महात्मा बसवेश्वरांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. आद्य समाज सुधारक तसेच कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे आणि वीरशैव धर्माचे पुनरूज्जीवन करणारी थोर विभुती म्हणून संत बसवेश्वर यांच्याकडे पाहिले जाते.
वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया दिनी इ.स. ११०५ मध्ये बसवेश्वर यांचा जन्म झाला.
धर्म, समाज, तत्त्वज्ञान, वाङ्मय, राजकारण अशा क्षेत्रांतील त्यांचे कार्य क्रांतिकारक स्वरूपाचे आहे. भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष म्हणून संत बसवेश्वर यांच्याकडे पाहिले जाते. महाराष्ट्रातील सोलापूर येथील मंगळवेढा येथे त्यांनी तब्बल ३१ वर्षे वास्तव्य केले होते. बसवेश्वरांनी मंगळवेढ्यातूनच लिंगायत धर्माची स्थापना केली, असे सांगितले जाते. धर्मप्रसारासाठी श्रवणबेळगोळा, बसवकल्याण या कर्नाटकातील प्रदेशांत आले. लिंगायत समाज बसवेश्वरांना शिववाहन नंदीचा अवतार मानतात. बसव, बसवाण्णा, बसवराय अशा नावांनी ते प्रसिद्ध होते.
आज बसवेश्वर जयंती आहे.
आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे पारंपारिक तिथिनुसार १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) हा जन्मदिवस जन्मतारीख मानला जातो.
सावरकर बंधू, मदनलाल धिंग्रा यांच्याकडून स्फूर्ती घेऊन अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला ठार मारण्याचे ठरविले. त्याला कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे अशा समवयस्क साथीदारांची जोड मिळाली.
२१ डिसेंबर १९०९ या दिवशी नाशकातल्या विजयानंद थिएटरमध्ये ‘शारदा’ या नाटकाच्या प्रयोगाचे वेळी अनंत कान्हेरे ह्यांनी जॅक्सनवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. जॅक्सन जागीच ठार झाला. पुढे कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांच्यावर खटला भरण्यात आला. २० मार्च इ.स. १९१० रोजी तिघांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.
१९१० : अनंत कान्हेरे , कृष्णाजी गोपाळ कर्वे , विनायक नारायण देशपांडे , १९ एप्रिल १९१० या दिवशी तिघांनाही ठाण्याच्या तुरुंगात फाशी अर्थातच बलिदान दिन.
विनामृत्तिका कुंभ जेव्हां दिसेना
विना मृत्तिका कुंभ कांहीं असेना
दिसेना असी ज्याविणें मृत्तिकाही
नसे मृत्तिकाही तयावीण कांहीं ॥१॥
घटाकार ज्या मृत्तिकेनेचि भासे
असी मृत्तिका ज्यास्वरुपीं उभासे
न कोण्ही तया स्वप्रकाशा प्रकाशी
म्हणूनि श्रुती बोलती सत्य त्यासी ॥२॥
• १६९५: पंडितकवी वामनपंडित यांनी भोगाव येथे समाधी घेतली.
जिम कॉर्बेट – हे नरभक्षक वाघ व त्यांच्या शिकारींच्या हकीकती लिहिणारे आयरिश वंशाचे हिंदुस्थानात जन्मलेले एक विश्वविख्यात शिकारी व लेखक होते. एकूण १९ वाघ आणि १४ बिबट्यांची शिकार जिम यांनी केली.
एडवर्ड जेम्स “जिम” कॉर्बेट यांचा जन्म जुलै २५, इ.स. १८७५ रोजी हिमालयाच्या कुमाऊॅं पर्वत रांगांच्या खोऱ्यात वसलेल्या नैनिताल (सध्याचे उत्तराखंड राज्य) येथे झाला. ते क्रिस्टोफर आणि मेरी जेन कॉर्बेट यांचे आठवे अपत्य होते. जिमच्या जन्माआधी त्यांचे वडील क्रिस्टोफर यांना नैनिताल येथे पोस्टमास्तर म्हणून नोकरी मिळाली. त्यांचे एक घर कालाधुंगी येथेही होते. उन्हाळी सुट्यांसाठी सर्व कुटुंबिय तेथेच वास्तव्यास असत.
लहानपणापासून जिम यांना वन्यजीवांविषयी आकर्षण होते. दिवसचे दिवस ते झाडाला लटकून जंगलात घडणाऱ्या गोष्टी आपल्या डोळ्यांनी टिपत. या सवयीचा त्यांना पुढील आयुष्यात खूप फायदा झाला. वडिलांच्या अकाली निधनानंतर जिमचे मोठे भाऊ टॉम यांना नैनिताल येथील पोस्टातच नोकरी मिळाल्याने समस्त कुटुंबिय तेथेच राहिले.
जिम यांचे शालेय शिक्षण नैनितालच्या ओक ओपनिंग्स स्कूल मध्ये तर उच्च शिक्षण तेथीलच सेंट जोसेफ कॉलेजमध्ये झाले. पदवीनंतर जिम यांना बंगाल आणि वायव्य रेल्वेच्या पंजाब मध्ये नोकरी मिळाली.मूळचे शिकारी असलेले जिम कॉर्बेट यांना लवकरच जाणवले की जंगलातील नैसर्गिक वाघांची आणि इतर मोठ्या वन्य जिवांची संख्या कमी होत चालली आहे. म्हणून त्यांनी बंदुकीऐवजी कॅमेरा वापरून वाघ आणि इतर वन्य जीव टिपले. फक्त नरभक्षक झालेले वाघ आणि बिबटे यांची शिकार त्यांनी केली.
१९०७ ते १९३८ या काळात सुमारे १,५०० लोकांना मारणाऱ्या डझनभर वाघ आणि बिबट्यांना त्यांनी मारले. चंपावतच्या नरभक्षक वाघाने ४३६ लोक तर पानारच्या नरभक्षक बिबट्याने ४०० लोकांचे बळी घेतले होते. या आणि अशाच इतर नरभक्षकांविषयी आणि जंगलातील त्यांच्या इतर अनुभवांविषयी जिम यांनी लिहिलेली सर्व पुस्तके जगभर गाजली. जगातील सुमारे २७ भाषांमध्ये त्यांची भाषांतरे झाली.
जिम कॉर्बेट यांच्या दूरदृष्टीमुळे भारतात वन्यजीवांना अभयाने राहता यावे म्हणून अभायारण्ये घोषित करण्यात आली. त्यातील पहिले लॉर्ड माल्कम हिली यांच्या नावाने हिली राष्ट्रीय उद्यान घोषित करण्याचा मान जिमना मिळाला. याच राष्ट्रीय उद्यानाचे १९५७ साली कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान असे नामांतरण करण्यात आले.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जिम कॉर्बेट आणि त्यांची बहीण मॅगी केन्यातील नायेरी येथे कायमच्या वास्तव्यास गेले. जंगलात निरिक्षण करता यावे म्हणून जिम यांनी झाडावर बांधलेल्या मचाणावर दि. ५-६ फेब्रुवारी १९५२ या दोन दिवसांच्या मुक्कामासाठी इंग्लंडची राजकुमारी एलिझाबेथ द्वितीय हजर होती. ते दोन दिवस सगळ्यांनी आनंदात घालविले. त्या दिवसांच्या आठवणींविषयी आपल्या ट्री टॉप्स या पुस्तकात जिम लिहितात, “मचाणावर चढतांना राजकुमारी असलेली एलिझाबेथ द्वितीय मचाणावरून उतरतांना इंग्लंडची महाराणी झाली”. कारण इंग्लंडचे राजे जॉर्ज सहावे यांचे त्या रात्री निधन झाले.
जिम कॉर्बेट यांचा मृत्यू एप्रिल १९, इ.स. १९५५ला केन्या मध्ये झाला. जिम कॉर्बेट यांची आठवण म्हणून १९६८ साली वाघाच्या एका उपजातीला (Indo Chinese Tiger) त्यांचे नाव Panthera tigris corbetti (Corbett’s Tiger) देण्यात आले.
• १९५५: ब्रिटिश-भारतीय वन्यजीव तज्ज्ञ आणि लेखक जिम कॉर्बेट यांचे निधन. (जन्म: २५ जुलै, १८७५)
- घटना :
१९४५: सोविएत रशिया आणि ग्वाटेमालामधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
१९४८: ब्रह्मदेशचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९५६: गीतरामायणातील शेवटचे गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले.
१९७१: सिएरा लिओन प्रजासत्ताक बनले.
१९७५: आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला.
• मृत्यू :
• १९९३: स्वातंत्र्यसैनिक डॉ. उत्तमराव पाटील यांचे निधन.
• १९९४: पंजाबचे माजी मंत्री मेजर जनरल राजिंदरसिंग उर्फ स्पॅरो यांचे निधन.
• १९९८: उद्योगपत्नी सौ. विमलाबाई गरवारे यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १९२८)
• २००३: भारतीय-इंग्रजी खलीफा मिर्जा ताहिर अहमद यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९२८)
• २००८: लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी सरोजिनी बाबर (जन्म: ७ जानेवारी, १९२०)
• २००९: मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या अहिल्या रांगणेकर यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १९२२)
• २०१०: लेखक आणि टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचे निधन. (जन्म: ७ जून १९१३)
- जन्म :
१८९२: ‘पद्मभूषण’ पुरस्कार सन्मानित शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट १९७३)
१९५७: भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांचा जन्म.






