आज संत कबीर जयंती

आज गुरुवार, जून ४, २०२६ रोजीचे पंचांग आणि दिनविशेष
युगाब्द : ५१२८
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर ज्येष्ठ १४, शके १९४८
सूर्योदय : ०६:०० सूर्यास्त : १९:१४
चंद्रोदय : २२:४१ चंद्रास्त : ०८:५८
शक : १९४८
संवत्सर : पराभव
उत्तरायण
ऋतू : ग्रीष्म
चंद्र माह : ज्येष्ठ (अधिक)
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : चतुर्थी – २३:३० पर्यंत
नक्षत्र : उत्तराषाढा – ०३:४१, जून ०५ पर्यंत
योग : शुक्ल – ०९:०३ पर्यंत
करण : बव – १०:२७ पर्यंत
द्वितीय करण : बालव – २३:३० पर्यंत
सूर्य राशि : वृषभ
चंद्र राशि : धनु – ०७:४१ पर्यंत
राहुकाल : १४:१६ ते १५:५५
गुलिक काल : ०९:१९ ते १०:५८
यमगण्ड : ०६:०० ते ०७:३९
अभिजित मुहूर्त : १२:१० ते १३:०३
दुर्मुहूर्त : १०:२५ ते ११:१८
दुर्मुहूर्त : १५:४२ ते १६:३५
अमृत काल : २०:३४ ते २२:२१
वर्ज्य : ०९:५३ ते ११:४०
गुरु गोबिंद दोनो खडे, काके लागू पाय ।
बलिहारी गुरु आपने, गोविंद दियो बताय॥
संत कबीर या दोह्यात गुरूंचे महत्व अधोरेखित करतांना म्हणतात कि जर समजा कधी जीवनात असा काही प्रसंग आला कि ज्यावेळी तुमच्या समोर तुमचे गुरु आणि गोविंद म्हणजे देव असे दोघेही उभे असले तर अश्यावेळी कोणाचे ऐकाल ?
कोणाच्या पायावर मस्तक टेकवाल ? या प्रश्नच उत्तरही संत कबीर स्वतःच देतात. ते म्हणतात कि आपले गुरूच आपले तारणहार आहेत असे खुद्द परमेश्वरानेच (कृष्णाने) म्हटले असतांना त्यांच्याच चरणांवर नतमस्तक होणे उचित राहील. संत कबीर यांना सामाजिक तसेच धार्मिक भेदभाव अजिबात मान्य नव्हता.यासाठी त्यांनी समाजातील जातीभेद धर्मभेद दुर करण्यासाठी नेहमी प्रयत्न केले. समाजातील अनेक सामाजिक तसेच धार्मिक अनिष्ठ रूढी परंपरांचा संत कबीर यांनी ठामपणे विरोध केला. आपल्या दोहयांमधुन त्यांनी समाजाला अनेक चांगले उपदेश तसेच चांगल्या शिकवणी दिल्या.सामाजिक प्रबोधन केले.
आज संत कबीर जयंती आहे.
मखमली आवाजाचे धनी एस.पी. बालसुब्रह्मण्यम- प्रसिद्ध गायक श्रीपती पंडितराद्युला बालसुब्रमण्यम(एस पी)यांचा जन्म मद्रास इलाख्यातील (तत्कालीन) (सध्या तामिळनाडूतील तिरुवल्लूर जिल्हा) कोनेटमपेट या गावी झाला. त्यांचे पिता हरिकथा निरुपणकार होते. संगीताचा वारसा त्यांना बालपणापासून लाभला.शालेय वयात त्यांनी संगीताचा अभ्यास सुरु केला आणि संगीत स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. एका स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.
अनंतपूर येथे त्यांनी अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेतला तथापि विषमज्वर झाल्याने प्रकृती अस्वास्थ्याने त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यानंतर असोसिएट मेंबर ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ इंजीनिअर्स या संस्थेचे (एएमआयआई) सभासदत्व त्यांनी घेतले. गंगाई अमरन,इलयाराजा, अनिरुद्ध, भास्कर या आपल्या संगीत क्षेत्रातील मित्रांसह त्यांनी एका बँडची स्थापना केली. त्यांची मातृभाषा तेलगू होती आणि एस. पी. कोदंडपाणी यांनी चित्रपटासाठी पार्श्वगायक म्हणून त्यांना तेलगू चित्रपटासाठी गायनाची प्रथम संधी दिली. एम. जी. रामचंद्रन, एम. जी. विश्वनाथन, शिवाजी गणेशन,जेमिनी गणेशन, या दाक्षिणात्य दिग्दर्शकांच्या चित्रपटांमध्ये गायक म्हणून काम करण्याची संधी त्यांना भविष्यात मिळाली आणि चित्रपटसृष्टीत पार्श्वगायक म्हणून त्यांचे नाव प्रसिद्ध झाले. हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता सलमान खान यांच्या आवाजाशी साम्य असल्याने त्याच्या चित्रपटातील त्याच्या गीतांना पार्श्वगायन करण्याची संधी सुब्रमण्यम यांना मिळाली. ही गाणी समाजात लोकप्रिय ठरली आहेत. संगीत क्षेत्रात एकाच व्यक्तीने ४०,००० गीते गायल्याचा विक्रम त्यांच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड यामध्ये नोंदविला गेला आहे. उपेंद्रकुमार या कानडी संगीतकारासाठी १९८१ साली त्यांनी बारा तासात २१ गाण्यांचे ध्वनिमुद्रण केलेले आहे.
१९४६ : पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक एस पी बालसुब्रमण्यम यांचा जन्म (मृत्यू : २५ सप्टेंबर, २०२०)
घटना :
१६७४: राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली. ब्रिटिश वकिलातीच्या मते त्यांचे वजन सुमारे ७३ किलो भरले.
१८७६: ट्रान्सकाँटिनेन्टल एक्स्प्रेस रेल्वे अमेरिकेच्या दोन तीरांना जोडणारी ही रेल्वेची पहिली प्रवासी खेप होती.
१८७८: ऑट्टोमन साम्राज्याने सायप्रस युनायटेड किंग्डमच्या हवाली केले.
१८९६: हेन्री फोर्ड यांनी तयार केलेल्या पहिल्या मोटारीचे यशस्वी परीक्षण.
१९४४: दुसरे महायुद्ध – दोस्त सैन्याने रोम जिंकले.
१९७०: टोंगाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
१९९३: आय.एन. एस. म्हैसूर या युद्धविनाशिकेचे जलावतरण.
१९९४: वेस्टइंडिजच्या ब्रायन लाराचा ८ डावांत ७ शतकांचा नवा विक्रम.
१९९७: इन्सॅट-२डी या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोऊरू येथून यशस्वी प्रक्षेपण झाले.
२००१: नेपाळचा शेवटचा राजा ग्यानेंद्र राज्यपदावर.
- मृत्यू :
- १९४७: बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचे निधन. (जन्म: ९ ऑक्टोबर १८७६)
- १९९८: इतिहासतज्ज्ञ डॉ.अश्विन दासगुप्ता यांचे निधन.
जन्म :
१९०४: भारतीय प्रकाशक, पर्यावरणवादी भगत पुराण सिंह यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट १९९२)
१९३६: पद्मश्री पुरस्कार सन्मानित चित्रपट अभिनेत्री नूतन बहल यांचा जन्म. (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९९१)
१९४७: विनोदी अभिनेता अशोक सराफ यांचा जन्म.
१९७४: भारतीय शेफ जॅकब सहाय्या कुमार अरुनी यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर२०१२ )






