भौतिकशास्त्रज्ञ मेघनाद साहा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

आज रविवार, फेब्रुवारी १६, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ २५ , शके १९४६
सूर्योदय : ०७:०६ सूर्यास्त : १८:३९
चंद्रोदय : २१:५१ चंद्रास्त : ०९:१५
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
उत्तरायण
ऋतु : शिशिर
चंद्र माह : माघ
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : चतुर्थी – ०२:१५, फेब्रुवारी १७ पर्यंत
नक्षत्र : हस्त – ०४:३१, फेब्रुवारी १७ पर्यंत
योग : धृति – ०८:०६ पर्यंत
करण : बव – १३:०१ पर्यंत
द्वितीय करण : बालव – ०२:१५, फेब्रुवारी १७ पर्यंत
सूर्य राशि : कुंभ
चंद्र राशि : कन्या
राहुकाल : १७:१२ ते १८:३९
गुलिक काल : १५:४६ ते १७:१२
यमगण्ड : १२:५३ ते १४:१९
अभिजित मुहूर्त : १२:३० ते १३:१६
दुर्मुहूर्त : १७:०७ ते १७:५३
अमृत काल : २१:४८ ते २३:३६
वर्ज्य : ११:०३ ते १२:५१

। अमेयाय च हेरम्ब परशुधारकाय ते । मूषक वाहनायैव विश्वेशाय नमो नमः ।

आज संकष्टी चतुर्थी आहे.

भारतीय चित्रपटांचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके – चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील आणि भारतातील पहिले चित्रपटनिर्माते म्हणून त्यांची ओळख आहे.

दादासाहेबांनी ३ मे १९१३ साली राजा हरिश्चंद्र चित्रपटाची निर्मिती करून भारतातील चित्रपट निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर १९३७ पर्यंतच्या १९ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी तब्बल ९५ चित्रपट आणि २६ लघुपटांची निर्मिती केली.
दादासाहेबांचा जन्म नाशिकपासून तीन किलोमीटरवर असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे झाला होता. १८८५ मध्ये त्यांनी मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. १८९० साली जे. जे. मधील शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी बडोद्यातील कला भवन येथे शिल्पकला, तंत्रज्ञान, रेखाटन, चित्रकला, छायाचित्रणकला आत्मसात केली. गोध्रा येथे काही काळ छायाचित्रकाराचा व्यवसाय केलेल्या दादासाहेबांना गोध्रात पसरलेल्या ब्युबॉनिक प्लेगच्या उद्रेकात प्रथम पत्नी आणि नंतर मूल दगावल्याने गोध्रा सोडावे लागले.

गोध्रा सोडल्यावर त्यांची ल्युमिएर बंधूंकडील चाळीस ‘जादूगारां’पैकी कार्ल हर्ट्झ याच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांना ‘भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थे’साठी ड्राफ्ट्समन म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या धडपड्या स्वभाव त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. नोकरीत त्यांचे मन लागत नव्हते. शिळाप्रेस छपाईच्या तंत्रात वाकबगार असलेल्या दादांनी छपाई व्यवसाय सुरु केला. त्यांनी राजा रविवर्मां सोबतसुद्धा काम केले. पुढे स्वत:चा छापखाना काढला, तसेच छपाईची नवी तंत्रे आणि यंत्रे अभ्यासायला जर्मनीची वारी केली.

छपाई व्यवसायात सहकाऱ्यांशी न पटल्याने त्यांनी छपाई व्यवसायास रामराम ठोकला. पुढे “लाईफ ऑफ ख्रिस्त” हा मूकपट पाहिल्यानंतर त्यांनी आपले लक्ष चित्रपट निर्मितीकडे वळवले. १९१२ साली त्यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला मूकपट काढला. ३ मे १९१३ साली मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात तो प्रेक्षकांसाठी पहिल्यांदा दाखविण्यात आला. त्यांच्या चित्रपटविषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रसृष्टीतील सर्वांत मोठा पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो.

१९४४: भारतीय चित्रपटाचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १८७० – त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र)

खगोल भौतिकशास्त्रज्ञ मेघनाद साहा : भारतीय भौतिकीविज्ञ. त्यांनी ऊष्मीय आयनीकरणाचे समीकरण मांडून त्यांचा उपयोग तारकेय वर्णपटांच्या स्पष्टीकरणार्थ केला. खगोल भौतिकीतील या महत्त्वाच्या कार्याकरिता ते प्रसिद्घ होते.

मेघनाद साहा यांनी आणवीय सिद्घांत आणि पुंजयामिकी यांमधील तत्त्वांचा वापर करून तारकेय वर्णपटांच्या चित्रलिपीचा सांकेतिक अर्थ शोधून काढण्याकरिता सर्वप्रथम प्रयत्न केला. तारकेय वातावरणातील तापमानाला (६,०००° से. किंवा अधिक) ताऱ्याचे घटक असलेल्या पुष्कळशा अणूंच्या बाह्य कवचातील इलेक्ट्रॉन छेदले जातात. या आणवीय छेदन प्रक्रियेला इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे आयनीकरण म्हणतात आणि छेदित अणूला आयन (विद्युत्भारित अणू)म्हणतात. अशा प्रकारे तारकेय वातावरणात मुक्त इलेक्ट्रॉन आणि छेदित अणू यांचे वायुमय मिश्रण असते.

साहा यांनी या मिश्रणास वायूचा गत्यात्मक सिद्घांत आणि ऊष्मागतिकी यांचे नियम लावले.
कोणत्याही मूलद्रव्याच्या अणुंकरिता छेदन किंवा आयनीभवन केवळ उच्च तापमानामुळे घडून येत नसून ते नीच दाबामुळे सुद्घा घडते, हे साहा यांनी सप्रमाण सिद्घ केले. दाबातील न्यूनीकरणामुळे छेदन झाल्यानंतर उरलेला अणू आणि मुक्त इलेक्ट्रॉन यांची गाठ पडण्याची संधी अधिक कमी होते आणि पुनःसंयोग होण्याचा वेग कमी होऊन आयनीकरण वेग बदलत नाही. हा सिध्दांत त्यांनी मांडला.

साहा समीकरणामुळे दिलेल्या दाबाला व तापमानाला तारकेय वातावरणातील आयनीभवनाच्या परिमाणाची आकडेमोड तसेच अणूपासून उत्तरोत्तर इलेक्ट्रॉन वेगळा काढण्याकरिता लागणाऱ्या ऊर्जेची आकडेमोड शक्य झाली. अशा प्रकारे साहा समीकरण तारा आणि अणू यांच्या मूलभूत संबंधाविषयीची पहिली सूत्ररूप मांडणी आहे. साहा यांनी १९२० मध्ये ‘ सूर्याच्या वर्णमय आवरणातील आयनीभवन’ या विषयावरील एक निबंध फिलॉसॉफिकल मॅगझीनमध्ये प्रसिद्घ केला. रेडिओ तरंगांचे प्रेषण, ज्योतींचे संवहन, प्रज्योत आणि स्फोटक विक्रियांची रचना यांमधील समस्या सोडविण्याकरिता साहा यांचा आयनीभवन सिद्घांत उपयुक्त ठरला आहे.
साहा यांनी कोलकाता येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स’ ही संस्था स्थापन करण्यात पुढाकार घेतला. ते या संस्थेचे सन्माननीय संचालक होते. त्यांच्या मृत्यूनंतर या संस्थेला त्यांचे नाव देण्यात आले. ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे फेलो होते (१९२७).

भारतीय विज्ञान परिषद संस्थेच्या एकविसाव्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते (१९३४). १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार म्हणून ते लोकसभेवर निवडून आले होते. आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांनी आपले लक्ष विज्ञानाच्या सामाजिक कार्याकडे वळविले.

• १९५६: खगोल भौतिकशास्त्रज्ञ आणि संसद सदस्य मेघनाथ साहा यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर१८९३)

  • घटना :
    १६५९: पहिला धनादेश ब्रिटीश बँकेतून काढण्यात आला, तो नँशनल वेस्टमिन्स्टर बँकेत जपून ठेवण्यात आला आहे.
    १७०४: औरंगजेबाने राजगड किल्ला जिंकून त्याचे नाव नबिशहागड असे ठेवले.
    १९१८: लिथुएनियाने रशिया व जर्मनीपासून स्वातंत्र्य जाहीर केले.
    १९५९: फिडेल कॅस्ट्रो क्युबाच्या अध्यक्षपदी रुजू झाले.
    १९६०: अमेरिकी अणुपाणबुडी ट्रायटन ने पाण्याखालून पृथ्वी प्रदक्षिणा करण्यास प्रस्थान केले.

• मृत्यू :

• १९६८: कृषी शिरोमणी आणि पहिले मराठी साखर कारखानदार नारायणराव सोपानराव बोरावके यांचे निधन. (जन्म: १७ ऑक्टोबर १८९२)
• १९९४: जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक पं. निवृत्तीबुवा सरनाईक यांचे निधन. (जन्म: ४ जुलै १९१२)
• १९९६: उद्योगपती, थरमॅक्स उद्योगसमुहाचे संस्थापक आर. डी. आगा यांचे निधन.
• २०००: सुप्रसिद्ध ग्रंथालय शास्रज्ञ बेल्लारी शामण्णा केशवान यांचे निधन.
• २००१: मराठी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शक रंजन साळवी यांचे निधन.

  • जन्म :
    १८७६: भारतातील पहिले सीनियर रँग्लर आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचा जन्म. (मृत्यू: ६ मे १९६६)
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »