साखर टंचाईचा पाकिस्तानला फायदा? भारतात निर्यातीची तयारी!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नवी दिल्ली : देशात साखरेचे दर वाढत असताना केंद्र सरकारने ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत १० लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली आहे. बाजारातील साखरेचा पुरवठा वाढवून दर नियंत्रणात आणण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.


या निर्णयानंतर पाकिस्तानच्या साखर उद्योगाकडून भारतात अतिरिक्त साखर निर्यात करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये सुमारे १२ लाख टन अतिरिक्त साखरेचा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले जात असून, भारतातील वाढत्या मागणीमुळे ही बाजारपेठ पाकिस्तानसाठी महत्त्वाची ठरू शकते.

मात्र, भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय व्यापार सध्या स्थगित असल्याने पाकिस्तानकडून साखरेची निर्यात तातडीने सुरू होण्याची शक्यता कमी आहे. त्यासाठी पाकिस्तान सरकारची मंजुरी तसेच दोन्ही देशांमधील आवश्यक व्यापारी व्यवस्था करावी लागणार आहे.

अतिरिक्त साखर भारतीय बाजारात पोहोचणार का?

दरम्यान, भारताने साखरेच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केवळ आयातीचा पर्याय स्वीकारलेला नसून, बाजारातील पुरवठा वाढविण्यासाठी विविध उपाययोजनांवरही भर दिला आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानची अतिरिक्त साखर भारतीय बाजारात पोहोचणार का, याकडे साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »