‘ओंकार’च्या नवीन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन रविवारी होणार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : ओंकार शुगर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या नवीन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन रविवार, २३ ऑगस्ट रोजी औंध, पुणे येथे होणार आहे, अशी माहिती ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील यांनी दिली आहे. नवीन कार्यालयामुळे कारखान्याच्या प्रशासनिक व व्यावसायिक कामकाजाला गती मिळणार असून शेतकरी व उद्योग क्षेत्रातील समन्वय अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे उदघाटन केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री तथा खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा माजी आमदार जयंत पाटील, अक्कलकोटचे आ. सचिन कल्याणशेट्टी, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्यासह विविध क्षेत्रांतील क्षेत्रातील नेते, शेतकरी प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटन समारंभास सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, अधिकारी, शेतकरी, सभासद आणि हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील यांनी केले आहे. नवीन कार्यालयामुळे कारखान्याच्या प्रशासनिक व व्यावसायिक कामकाजाला गती मिळणार असून शेतकरी व उद्योग क्षेत्रातील समन्वय अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

येथे होणार कार्यक्रम
हा कार्यक्रम ओंकार ग्रुप, ऑफिस क्र. ५०१, पाचवा मजला, फॉर्च्यून बिझनेस हाऊस, सकाळनगर गेट नं. २, औंध, पुणे येथे होणार आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »