साखरेचे दर लवकरच १०० रुपयांवर जाणार: प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

छत्रपती संभाजीनगर: देशभरात लवकरच म्हणजे येत्या १० ते १२ दिवसांत साखरेचे भाव प्रति किलो १०० रुपयांवर पोहोचतील, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी हे सण गोड होण्याऐवजी कडू होणार असून, या दरवाढीविरोधात जनतेने रस्त्यावर उतरून लोकप्रतिनिधींच्या घरांसमोर धरणे आंदोलन केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी साखर दरवाढ आणि केंद्र सरकारवर टीका केली.
सध्या केंद्र सरकारकडे कोणतेही ठोस नियोजन नसून फक्त नफा कमावणे हाच त्यांचा अजेंडा असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला. मळी आणि रॉ शुगर इथेनॉल निर्मितीकडे वळवण्यात आल्यामुळे देशात साखरेचा तुटवडा निर्माण झाला आहे. भारताला आता दुप्पट किमतीने तब्बल १० मिलियन टन साखर आयात करावी लागण्याची परिस्थिती आहे, असे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
साखरेनंतर आता गुळाचाही भाव प्रचड वाढला
मुंबई -: गोड लागणाऱ्या साखरेचा वाढलेला हा भाव पाहून चहा कडू लागावा अशी परिस्थिती निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आता साखरेसोबतच गुळाचा भावही वाढला आहे. किरकोळ बाजारात तर साखरेच भाव ८० रुपयांच्या घरात पोहोचला आहे. अचानक झालेल्या या भाववाढीमुळे सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. गोड लागणाऱ्या साखरेचा वाढलेला हा भाव पाहून चहा कडू लागावा अशी परिस्थिती निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. साखरेसोबतच आता गुळाचा भावही ७० रुपयांवर गेला आहे-






