किसनवीरच्या सेवानिवृत्तांची थकित बाकी त्वरित द्या

आवडल्यास ही बातमी शेअर करा


सातारा : भुईंज येथील किसनवीर कारखान्यातील सेवानिवृत्त झालेल्‍या तब्बल ९४ कामगारांच्या हाताला सध्या रोजगार नसल्याने त्‍यांची आर्थिक विवंचना सुरू आहे. यासंदर्भात कारखाना प्रशासनाकडे वारंवार मागणी करून देखील या कर्मचाऱ्यांची थकित बाकी देण्यात आली नाही. त्‍यामुळे कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित निवृत्त कामगार हे २०१९ ते २०२४ यादरम्यान निवृत्त झाले होते. कारखान्याकडून येणे असलेला या निवृत्त कामगारांचा थकीत पगार, पीएफ, रकमेतील फरक, कपात झालेल्या विमा, सोसायटी बेअर्स, कर्ज हप्ते इ रक्कमा ज्या-त्या संस्थेकडे वर्ग कराव्यात, शिल्लक रजेचा पगार मिळावा, अशी मागणी कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी खा. नितीन पाटील यांच्याकडे नुकतीच एका निवेदनाद्वारे केली.

याबाबत त्‍यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी रखडली आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे कारखान्याने ग्रॅच्युटीची रक्कम, सोसायटीकडील देणी, शेअर्स व ठेवी रक्कम द्यावी, थकीत वेतन काळातील बोनस, पेन्शन व हंगामी कामगारांचा पेंशन मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »