निर्यातीचे धोरण ठरवण्यासाठी केंद्राशी चर्चा : सावे

औरंगाबाद : साखर निर्यातीमुळे कारखानादारांना आणि पर्यायाने ऊस उत्पादनकांना चांगला लाभ होतो, त्यामुळे साखरेचे निर्यात धोरण ठरवण्यासाठी लवकरच केंद्र सरकारशी बोलणी करण्यात येईल, अशी माहिती सहकारमंत्री अतुल सावे यांनी दिली
चित्तेपिंपळगाव येथे छत्रपती संभाजीराजे साखर उद्योग समूहाच्या २२ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ रविवारी सावे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बाेलत हाेते.
अध्यक्षस्थानी कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक हरिभाऊ बागडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नारायण कुचे, देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासह समूहाचे संचालक उद्योजक राम भोगले, विवेक देशपांडे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.