पहूर-जामनेर मार्गावर साखरेचा ट्रक उलटला

आवडल्यास ही बातमी शेअर करा

जामनेर : पहूर ते जामनेर मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने सोनाळा फाट्याजवळील वळणावर साखरेची वाहतूक करणारा (एमपी- ०९, एचजे ०४४६) या क्रमांकाचा ट्रक उलटल्याची घटना रविवारी दुपाच्या सुमारास घडली. या अपघातात एकजण जखमी झाल्याचे कळते. यामुळे सोनाळा फाट्याजवळ वाहतूक ठप्प झाली होती. पहूर पोलिसांच्या सहकार्याने वाहतूक सुरळीत करण्यात आली.

सुदैवाने या अपघाता कोणतीही प्राणहानी झाली नाही. परंतु, महामार्गावरच ट्रक उलटल्याने वाहतूक मात्र ठप्प झाली होती.  पहूर वाहतूक पोलिसांच्या मदतीने ही रहदारी पूर्ववत करण्यात आली. दरम्यान, किरकोळ जखमी झालेल्या चालक व अन्य एकाला प्रथमोपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांत उशिरापर्यंत कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »