‘स्वाभिमानी’चा सातला पुण्यात मोर्चा

पुणेः ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपी आणि इतर मागण्यांसाठी, स्वाभिमानी शेतकरी संघटना येत्या ७ नोव्हेंबर रोजी साखर आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहे.
स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा साखर आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे. मागील वर्षीची एफआरपी आणि त्यावर अधिक रक्कम तात्काळ मिळावी, साखर कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाईन असावेत आदी ‘स्वाभिमानी’च्या मागण्या आहेत.