अतिरिक्त ऊस संपेपर्यंत साखर कारखाने सुरू ठेवा : सहकार मंत्री

आवडल्यास ही बातमी शेअर करा

मुंबई – संपूर्ण अतिरिक्त ऊस संपत नाही तोपर्यंत साखर कारखाने सुरू ठेवण्याचे आदेश सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आले आहेत. या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी उशिराच्या तोडीमुळे वजन कमी भरणार असल्याने तोटा सहन करावा लागणार आहे.

राज्यातील अनेक भागातील ऊस फडात जैसे थे अवस्थेच आहेत, त्यामुळे त्याचा मोठा फटका पश्चिम महाराष्ट्रासह अनेक भागातील ऊस उत्पादकांना बसला आहे. त्यामुळे सहकारम मंत्री बाळासाहेब पाटील यांनी 31 मे ही साखर कारखाने बंद करण्याची मुदत नसून जोपर्यंत ऊस संपत नाही तोपर्यंत कारखाने सुरुच राहणार असल्याचे सांगितले आहे.

ऊस संपत नाही तोपर्यंत कारखाने सुरु
शेतकऱ्यांचा ऊस मोठ्या प्रमाणात राहिल्याने सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी ऊस संपत नाही तोपर्यंत कारखाने सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याबरोबरच त्यांनी सांगितले आहे की, 1 मे पासून तोडल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या उसाला प्रति टन 200 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे आर्थिक तोटा भरुन काढण्याचा प्रयत्न असल्याचेही सहकार मंत्र्यांनी सांगितले.

ऊस तोड झाली नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसर वाहतुकदारही अडचणी सापडले आहेत. अनेक वाहतूकदारांचा कारखान्याबरोबर असलेला करार संपला आहे, मात्र कारखाना सुरु असल्याने अनेक वाहने ऊस वाहतूक करत आहेत. उसतोडीच्या शेवटच्या टप्प्यात ऊसतोड असल्यामुळे पन्नास किलोमीटरच्या पुढे वाहतूक करणाऱ्या वाहतुकदारांनाही पाच रुपये जादा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »