आजचे पंचांग

आवडल्यास ही बातमी शेअर करा

शुक्रवार, जुलै १, २०२२
युगाब्द : ५१२४
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर आषाढ १० शके १९४४
सूर्योदय : ०६ :०४ सूर्यास्त : १९ :२०
चंद्रोदय : ०७ :४२ चंद्रास्त : २१ :१९
शक सम्वत : १९४४
संवत्सर : शुभकृत्
दक्षिणायनम्
ऋतू : ग्रीष्म
चंद्र माह : आषाढ
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : द्वितीया – १३ :०९ पर्यंत
नक्षत्र : पुष्य – ०३ :५६, जुलै ०२ पर्यंत
योग : व्याघात – १० :४७ पर्यंत
करण : कौलव – १३ :०९ पर्यंत
द्वितीय करण : तैतिल – ०२ :१४, जुलै ०२ पर्यंत
सूर्य राशि : मिथुन
चंद्र राशि : कर्क
राहुकाल : ११ :०३ ते १२ :४२
गुलिक काल : ०७ :४४ ते ०९ :२३
यमगण्ड : १६ :०१ ते १७ :४१
अभिजित मुहूर्त : १२ :१६ ते १३ :०९
दुर्मुहूर्त : ०८ :४४ ते ०९ :३७
दुर्मुहूर्त : १३ :०९ ते १४ :०२
अमृत काल : २० :४७ ते २२ :३४
वर्ज्य : १० :०४ ते ११ :५१

रुग्णांच्या सेवेसाठी २४ x ७ कार्यरत असणार्या डॉक्टर्सना यादिवशी धन्यवाद दिले जातात. त्यांच्या सेवेप्रती या दिवशी आदर आणि आभार व्यक्त केले जातात.
भारताचे प्रसिद्ध चिकित्सक डॉ विधान चंद्र रॉय यांना श्रद्धांजली आणि सन्मान म्हणून 1 जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो.

आज भारतीय डॉक्टर दिवस आहे

महाराष्ट्र शासनाने कृषि दिन हा १ जूलै रोजी वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त घोषित केला आहे. आज महाराष्ट्र कृषि दिवस आहे.

आज सनदी लेखापाल दिन आहे.

आधुनिक पश्चिम बंगालचे शिल्पकार, आंतरराष्ट्रीय कीर्तींचे निष्णात डॉक्टर व निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते. डॉ. बिधनचंद्र रॉय त्यांचा जन्म पाटणा येथे सुविद्य कुटुंबात झाला. वडील प्रकाशचंद्र ब्राह्मो समाजाचे अनुयायी असून जिल्हाधिकारी होते, तर आई−अधोरेकामीनी−समाज कार्यकर्ती होती. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पाटण्यात होऊन नंतर त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून एल्. एम्. एस्. (१९०६) व एम्. डी. (१९०८) या वैद्यकातील उच्च पदव्या मिळविल्या आणि इंग्लंडमध्ये राहून एल्. आर्. सी. पी. (१९०९) व एफ्. आर्. सी. एस्. (१९११) या उच्च पदव्या संपादन केल्या.
भारतात परतल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांची साहाय्यक शल्यचिकित्सक म्हणून कलकत्त्यातील कॅम्बेल वैद्यक महाविद्यालयात नियुक्ती केली पण तेथील यूरोपीयांच्या उद्धट वर्तनामुळे त्यांनी ती सोडून कामिकल वैद्यक महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी धरली. शिवाय खाजगी वैद्यक व्यवसायामुळे त्यांची अर्थप्राप्ती वाढली व नावलौकिक झाला. १९२३ मध्ये देशबंधू दासांच्या स्वराज्य पक्षातर्फे ते सर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा पराभव करून बंगालच्या कायदेमंडळावर निवडून आले. चित्तरंजन दासांच्या मृत्यूनंतर ते त्या पक्षाचे उपनेते झाले. पुढे ते काँग्रेसच्या राजकारणाकडे आकृष्ट झाले.

काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य व कलकत्ता अधिवेशनाच्या स्वागत समितीचे सचिव म्हणून त्यांनी काम केले. यावेळी म. गांधी, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू इ. ज्येष्ठ नेत्यांशी त्यांचा वैद्यकीय सल्लागार या नात्याने परिचय वाढला. असहकार चळवळीच्या वेळी त्यांनी कायदेमंडळाचा राजीनामा दिला. त्यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला. त्याचवेळी कलकत्ता महानगरपालिकेचे ते महापौर म्हणून निवडून आले (१९३१-३२) व पुढे प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्षही झाले (१९३४). म. गांधीच्या येरवड्यातील उपोषणाच्या वेळी त्यांनीच त्यांच्या प्रकृतीची काळजी वाहिली. सक्रिय राजकारणातून ते आपल्या व्यवसायासाठी बाहेर पडले आणि त्यांनी रुग्णसेवेवर लक्ष केंद्रित केले. त्यात त्यांनी रॉयल सोसायटी ऑफ ट्रॉपिकल मेडिसन अँड हायजीन (१९३६) अमेरिकन सोसायटी ऑफ चेस्ट फिजिशियन्स (१९४०) इत्यादींची छात्रवृत्ती मिळविली. अमेरिका-यूरोपचे दौर केले. पुढे इंडियन मेडिकल कौन्सिलचे ते अध्यक्षही झाले, परंतु पुन्हा महात्मा गांधींच्या आग्रहास्तव ते काँग्रेच्या कार्यकारिणीवर आले (१९३९). १९४२ ते १९४४ या काळात ते कलकत्ता विद्यापीठाचे कुलगूरू होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांना संयुक्त प्रांताचे राज्यपालपद देऊ करण्यात आले, पण ते त्यांनी नाकारले. तेव्हा त्यांना पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री करण्यात आले. १९५२, १९५७ व १९६२ अशा तिन्ही सार्वत्रिक निवडणुकांत ते निवडून आले. या पदावर ते अखेरपर्यंत होते.
त्यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत प. बंगाल राज्यात अनेक मौलिक सुधारणा केल्याः विस्थापित निर्वासितांचा प्रश्न, अन्नधान्य तुटवडा, दुष्काळ, बेकारी इ. महत्त्वाच्या प्रश्नांत लक्ष घालून विधायक योजना कार्यान्वित केल्या व राबविल्या आणि जमीनदारी नष्ट करून जमिनीची कमाल मर्यादा निश्चित केली आणि जलसिंचन योजना, उर्वरके, बी-बियाणे इ. कृषीविषयक बाबींत सुधारणा केल्या. उद्योगधंद्यांना उत्तेजन दिले. दुर्गापूरच्या औद्योगिकीकरणाचे श्रेय बिधनचंद्र यांच्याकडे जाते. त्यामुळेच त्यांना पश्चिम बंगालचे आधुनिक शिल्पकार मानतात.
अखेरपर्यंत ते अविवाहित राहिले. राष्ट्राची व गोरगरीब रुग्णांची सेवा हा त्यांचा कायमचा ध्यास होता. त्यांनी आपली संपत्ती व राहते घर वैद्यकीय न्यायास अर्पण केले. शैक्षणिक क्षेत्रात त्यांना अनेक मान-सन्मान मिळाले तसेच कलकत्ता आदी विद्यापीठांनी सन्मान डी. लिट. पदवी दिली. भारत सरकारने त्यांच्या सेवेचा बहुमान भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन केला .
१८८२ : भारतरत्न पुरस्कार सन्मानित, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि शिल्पकार डॉ. बिधनचंद्र रॉय यांचा जन्म. (मृत्यू : १ जुलै, १९६२)

घटना :
१६९३ : संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मोगलांकडे गेलेला सिंहगड नवजी बलकवडे यांनी पुन्हा स्वराज्यात आणला.
१८७४ : पहिले व्यावसायिक टंकलेखन यंत्र (टाइपराइटर) ची विक्री सुरु झाली.
१८८१ : जगातील पहिला टेलिफोन कॉल करण्यात आला.
१९०३ : पहिल्या टूर डी फ्रान्स सायकल रेसची सुरवात झाली.
१९०८ : एसओएस (SOS) हे आंतरराष्ट्रीय तत्काळ चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले.
१९०९ : क्रांतिकार कमदनलाल धिंग्रा यांनी कर्नल विल्यम कर्झन वायली यांची गोळ्या झाडून हत्या केली.
१९१९ : कै. बाबूराव ठाकूर यांनी तरुणभारत वृत्तपत्राची सुरुवात.
१९३३ : नाट्यमन्वंतरच्या आंधळ्यांची शाळा नाटकाचा १ला प्रयोग झाला.
१९३४ : मानवी शरीराचे सर्वप्रथम छायाचित्र घेण्यात अमेरिकन डॉक्टरांना यश आले.
१९४८ : बाजारपेठेतील व्यापार्यांचे नेतृत्त्व करणार्या पूना मर्चंट्स चेंबर या संस्थेची स्थापना झाली.
१९५५ : स्टेट बँक ऑफ इंडिया अॅक्ट १९५५ अन्वये स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आली. या आधी बँकचे नाव इंपिरिअल बँक होते.
१९६० : रवांडा व बुरुंडी हे देश स्वतंत्र झाले.
१९६२ : सोमालिया व घाना हे देश स्वतंत्र झाले.
१९६३ : अमेरिकेतील पत्रव्यवहारामध्ये झिप कोड वापराची सुरवात करण्यात आली.
१९६६ : कॅनडा मधील पहिल्या रंगीत टेलिव्हिजन चे प्रक्षेपण टोरांटो येथून सुरु झाले.
१९७९ : सोनी कंपनी ने व्हॅकमन प्रकाशित केला.
१९९१ : सोविएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांत अस्तित्त्वात असलेला वॉर्सा करार संपुष्टात आला.
१९९७ : सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टर्सच्या यादीत भारताची कुंजराणी देवी यांना स्थान मिळाले.
२०१५ : डिजिटल इंडिया या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
२०१८ : भाटिया कुटुंबातील (एकाच घरात )११ कुटुंबीयांचे मृतदेह टांगलेल्या अवस्थेत सापडल्याने दिल्ली हादरून गेली. या मृत्यूंमागे कोणत्या आध्यात्मिक शक्तीच्या मागे धावण्याती इच्छा किंवा कोणती काळी जादू करण्याचा उद्देश होता का या दृष्टीने पोलीस शोध घेत आहेत. कारण या घरातून सापडलेल्या वस्तूंमुळे ही सामूहिक आत्महत्या असण्याची शक्यता वाढली आहे. घरात सापडलेल्या एका डायरीनुसार या सामूहिक आत्महत्येचा दिवस आणि वेळही ठरली होती.

• मृत्यू :
• १९३८ : प्रख्यात कायदेपंडित, विद्वान गणेश श्रीकृष्ण तथा दादासाहेब खापर्डे यांचे निधन. (जन्म : २७ ऑगस्ट, १८५४)
• १९४१ : स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक पक्षाचे नेते व श्रेष्ठ वृत्तपत्रकार, पहिल्या गोलमेज परिषदेचे विशेष अतिथी, उत्तरप्रदेशचे शिक्षणमंत्री सर सी. वाय. चिंतामणी याचं निधन. (जन्म : १० एप्रिल, १८८० – विजयनगरम्, आंध्र प्रदेश)
• १९६२ : भारतरत्न पुरस्कार सन्मानित अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तमदास टंडन यांचे निधन. (जन्म : १ ऑगस्ट, १८८२)
• १९८९ : कवी तसेच शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य ग. ह. पाटील यांचे निधन. (जन्म : १९ ऑगस्ट १९०६)
• १९९४ : दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाशयोजक राजाभाऊ नातू यांचे निधन.

जन्म :
१८८७ : कविवर्य एकनाथ पांडुरंग रेंदाळकर यांचा जन्म. (मृत्यू : २२ नोव्हेंबर, १९२०)
१९१३ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, रोहयो योजनेचे जनक वसंतराव नाईक यांचा जन्म. (मृत्यू : १८ ऑगस्ट, १९७९)
१९३८ : पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा जन्म.
१९४९ : विद्यमान उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचा जन्म.
१९६१ : भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला यांचा जन्म. (मृत्यू : १ फेब्रुवारी, २००३)
१९६६ : रामपूर-साहसवान घराण्याचे शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान यांचा जन्म.

आपला दिवस मंगलमय जावो

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »