वैद्यनाथने माझ्या ऊसाचे पैसे सुद्धा दिले नाही : धनंजय मुंडे

बीड : शेतकऱ्यांनी ऊस लावला, ऊस वाढला, मग अतिरिक्त झाला. मग करायचं काय? असा प्रश्न उपस्थित झाला. आपल्या भागातील वैद्यनाथ साखर कारखाना व्यवस्थित चालवू शकत नाहीत. शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न उपस्थित होणार म्हणून मी अंबाजोगाईचा आंबा साखर कारखाना भाडे तत्वावर घेतला. उशिरा का होईना गाळपासाठी सुरू केला. या कारखान्यात जवळपास २.२५ लाख टन ऊस घेण्यात आला आणि शेतकऱ्यांचा ऊस शेतातून कारखान्यात गेला. तसेच एफआरपी २००० प्रमाणे शेतकऱ्यांना पेमेंटही दिले. कर्मचाऱ्यांचेही पेमेंट दिले. पण माझा स्वतःचा ऊस या वैद्यनाथ साखर कारखान्यात लावला आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.
वैद्यनाथ साखर कारखान्याने मागच्या ३ महिन्यात माझ्या गेलेल्या ऊसाचे पैसे सुद्धा दिलेले नाहीत. तसं मी माझा ऊस माझ्या साखर कारखान्यात नेऊ शकलो असतो. पण मग वैद्यनाथ साखर कारखान्याचे सभासदत्व रद्द केले गेले असते. म्हणून मी माझा उस हा वैद्यनाथ साखर कारखण्यातच घेऊन जाणार आहे. कारण त्यामुळे मी सभासद म्हणून तरी राहील, असं धनंजय मुंडे म्हणाले. जवळपास २ लाख ९८ हजार टन ऊस हा वैद्यनाथ साखर काराखान्यात गाळपासाठी गेला आहे. या मी अधिकाऱ्याला विचारले. मात्र, या ऊसाची साखरच नाही बनली म्हणे. मग ऊस गेला कुठे? रस गेला तर साखर कशी झाली नाही? मग इथेनॉल तरी झाला असेल. त्याचे तरी पैसे आले असतील. या करखाण्याची जवळपास ४००० हजार टन प्रति दिन ऊस गाळपाची क्षमता आहे, असा खोचक सवाल यावेळी धनंजय मुंडे यांनी नाव न घेता पंकजा मुंडेंन यांना केला. पंकजा मुंडे वैद्यनाथ साखर कारखाना व्यवस्थित चालवू शकत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. येणाऱ्या काळात मुंगीचा साखर कारखाना सुद्धा आपणच घेणार आणि तो ४००० हजार टनाने चालवणार असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.
वैद्यनाथ साखर कारखान्याचे वैभव आम्ही पाहिले. आशिया खंडात एकमेव समृद्ध म्हणून हा कारखाना उभा होता आणि त्याचे आज काय हाल होत आहेत, हे सर्वच पाहत आहेत. येणाऱ्या काळात मी परत माझ्या हिमतीवर कारखाना उभा करणार आहे. अवघ्या ६ महिन्यांत नवी सुतगीरणी आम्ही सीरसाळा येथे सुरू करणार आहोत.
ज्या सूतगिरणीमुळे माझ्यावर खोट्या केस केल्या माझ्यावर आरोप केले त्या सूत गिरणीला सुद्धा २ माहिन्यांच्या आत सुरू करणार असल्याचा मानस धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवला. पश्चिम महाराष्ट्रत फळबागायती शेती केली जाते. मात्र, आपला भाग मागास म्हणून ओळखला जातो आणि हा मागसलेपणाचा ठपका आपल्याला खोडून काढायचा आहे. यासाठी मी प्रयत्न करणार असा विश्वास धनंजय मुंडेंनी व्यक्त केला.
खरीप हंगामाची तयारी पूर्ण! आठ लाख हेक्टर क्षेत्रासाठी बियाणी, खते उपलब्ध
खरंतर शेतकऱ्याचे खूप अवघड झाले आहे. शेतात ऊस आहे आणि पण बील अडकून पडेल म्हणून आपण काहीच बोलत नाहीत गप्प बसतो. हे चुकीचं आहे. मात्र, असं दुसरीकडे चालत नाही. कारखानदाराला जाब द्यावाच लागतो आणि शेतकऱ्यांनीही आवाज उठवलाच पाहिजे, म्हणत वैद्यनाथ साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी थकलेल्या बिलासाठी आवाज उठवला पाहिजे, असं आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं.