संत ज्ञानेश्वरांची विश्वकल्याणाची प्रार्थना

आज सोमवार, सप्टेंबर २१, २०२६
🕉️ युगाब्द : ५१२८
☀️ भारतीय राष्ट्रीय सौर भाद्र दिनांक ३०, शके १९४८
🌅 सूर्योदय : ०६:२७
🌇 सूर्यास्त : १८:३६
🌙 चंद्रोदय : १५:१२
🌙 चंद्रास्त : ०२:१७, सप्टेंबर २२
🌙 चंद्रमास : भाद्रपद
🌓 पक्ष : शुक्ल पक्ष
🔱 आजचे पंचांग
▫️ तिथी : दशमी — २०:०० पर्यंत
▫️ नक्षत्र : उत्तराषाढा — पूर्ण रात्रपर्यंत
▫️ योग : शोभन — १६:०६ पर्यंत
▫️ करण : तैतिल — ०६:५८ पर्यंत
▫️ द्वितीय करण : गर — २०:०० पर्यंत
▫️ सूर्य राशी : कन्या
▫️ चंद्र राशी : धनु — ११:१५ पर्यंत
⏰ महत्त्वाचे कालखंड
🔸 राहुकाल : ०७:५८ ते ०९:२९
🔸 गुलिक काल : १४:०३ ते १५:३४
🔸 यमगंड : ११:०० ते १२:३१
🔸 अभिजित मुहूर्त : १२:०७ ते १२:५६
🔸 दुर्मुहूर्त : १२:५६ ते १३:४४
🔸 दुर्मुहूर्त : १५:२१ ते १६:१०
🔸 अमृत काल : ००:०२, सप्टेंबर २२ ते ०१:४८, सप्टेंबर २२
🔸 वर्ज्य : १३:२५ ते १५:११
━━━━━━━━━━━━━━━━━━
🌍 आजचा दिनविशेष 🌍
🧠 जागतिक अल्झायमर दिन
२१ सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झायमर दिन म्हणून ओळखला जातो. साजरा केला जातो असे म्हणणे चुकीचे ठरेल, कारण आनंद देणारे क्षण किंवा विषय साजरे केले जातात. अल्झायमर विकारात खूप यातना दडल्या 🌸 संत ज्ञानेश्वरांची विश्वकल्याणाची प्रार्थना 🌸
आहेत.
आज आंतरराष्ट्रीय अल्झायमर दिन आहे.
🕊️ आंतरराष्ट्रीय शांतता दिन
जगभरात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून साजरा केला जातो. शांतता दिवस देशांमध्ये आणि लोकांमध्ये स्वातंत्र्य, शांतता आणि आनंदाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. संपूर्ण पृथ्वीवर शांतता आणि अहिंसा प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय शांतता दिन साजरा केला जातो.
🌸 संत ज्ञानेश्वरांची विश्वकल्याणाची प्रार्थना 🌸
।। जे खळांची व्यंकटी सांडो ।
तयां सत्कर्मीं रती वाढो ।
भूतां परस्परें जडो ।
मैत्र जीवांचें ॥ ।।
।। दुरिताचें तिमिर जावो ।
विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांछील तो ते लाहो ।
प्राणिजात ॥ ।।
🙏 आज आंतरराष्ट्रीय शांतता दिन आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━
🇮🇳 “राष्ट्राय स्वाहा, इदं राष्ट्राय, इदं न मम” 🇮🇳
लक्ष्मणराव इनामदार तथा वकील साहेब
भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या आयुष्याला आकार, दिशा व अस्तित्व देणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे, स्व. लक्ष्मणराव इनामदार.
लक्ष्मणरावांचा जन्म २१ सप्टेंबर १९१७ रोजी खटाव – सातारा येथे झाला. एलएल.बी. करीत असताना हैद्राबादच्या निजामाविरुद्धच्या आंदोलनात १९३९ साली त्यांनी उडी घेतली. १९४३ मध्ये वकील झाल्यावर संघाचा प्रचारक म्हणून नवसारीतून केलेली सुरुवात अखेरच्या श्वासानंतर थांबली. गुजरातमध्ये त्यांना आता वकील साहेब म्हणून ओळखू लागले होते.
१९५२ मध्ये लक्ष्मणराव संघाचे प्रांतप्रचारक झाले. सारा गुजरात त्यांनी पालथा घातला. जन्माने महाराष्ट्रीय असले तरी वेष, भाषा यादृष्टीने ते सर्वार्थाने गुजराती होते. नरेंद्र मोदी रामकृष्ण-मठ, बेलूर येथून परत वडनगरला आले.
वडनगरला स्वयंसेवकांना लक्ष्मणराव संबोधित करीत असता मोदी प्रभावित झाले. लक्ष्मणरावांच्या प्रेरणेने १९७२ मध्ये मोदींनी संघाचे प्रचारक म्हणून सुरुवात केली. कठोर शिस्त, प्रचंड मेहनत आणि लोकांशी संवाद करण्याचे व प्रेरित करण्याचे कौशल्य मोदींनी लक्ष्मणरावांकडून आत्मसात केले. मोदींना ते मुलांसारखे मानत. मोदींच्या आयुष्यावर त्यांचा मोठा प्रभाव आहे. राजकारणाबरोबर आसने, योगा, प्राणायाम याचेही धडे मोदींनी त्यांच्याकडून घेतले.
“वाजविली तर बासरी, नाहीतर काठी”, हा दृष्टिकोन लक्ष्मणरावांनी मोदींना शिकविला. लक्ष्मणरावांच्या एका मंत्राचा नरेंद्रजी मोदी आयुष्यभर जागर करत आहेत — “समर्पित होऊन देशाची सेवा करायची.”
राष्ट्र पुनर्निर्माणाच्या प्रयत्नांत सहकाराचे महत्त्व ओळखून सहकारी चळवळीची गुणात्मक वाढ व्हावी आणि या चळवळीत सुसंस्कारित कार्यकर्त्यांची फळी तयार व्हावी म्हणून लक्ष्मणरावांनी १९७८ मध्ये सहकारभारती या संस्थेची स्थापना केली.
सहकारभारतीत आज २०१७ साली, भारतभरातील ४०० जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या २०,००० हून अधिक सहकारी संस्था आहेत.
कै. लक्ष्मणराव इनामदार यांच्याप्रमाणेच त्यांचे एक बंधू श्री. तात्या इनामदार यांनीसुद्धा लक्ष्मणरावांप्रमाणेच सी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संघासाठी आजन्म संघ प्रचारकी जीवनव्रत घेतले. तसेच त्यांचे अजून एक बंधू श्री. किसनभाऊ हेसुद्धा संघाचे काही वर्षे प्रचारक होते.
🇮🇳 “राष्ट्राय स्वाहा, इदं राष्ट्राय, इदं न मम” 🇮🇳
📌 १९१७ : रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक लक्ष्मणराव इनामदार तथा वकील साहेब यांचा जन्म
(भाद्रपद शु. ५, ऋषी पंचमी)
(मृत्यू : १५ जुलै, १९८४)
━━━━━━━━━━━━━━━━━━
🎶 संगीत अभ्यासक — पं. जितेंद्र अभिषेकी 🎶
सुस्पष्ट उच्चार, लयकारी व सरगम यांनी नटलेली ख्यालगायकी आणि विशेष कटाक्ष ठेवून मांडलेल्या बंदिशी हे त्यांच्या गायनाचे मर्म होते.
गोव्यातील मंगेशीच्या देवळात शंकराच्या पिंडीवर अभिषेक करणाऱ्या नवाथे यांच्या अभिषेकी घराण्यात त्यांचा जन्म झाला. कीर्तनकार असलेल्या वडिलांकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढे त्यांनी पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे संगीताचे रीतसर धडे घ्यायला सुरुवात केली.
संगीताच्या शिक्षणासाठी त्यांनी गोवा सोडले आणि ते पुण्याला आले. पुण्यात अनाथाश्रमात राहून, वारावर जेवून, माधुकरी मागून ते शिकले. त्यांनी एकूण २१ गुरू केले व प्रत्येक गुरूकडून नेमके तेवढेच घेतले. ते सारे संस्कार आत्मसात करून आपली स्वतंत्र गायनशैली निर्माण केली.
संगीताची आराधना करत असताना त्यांनी त्यांच्या शालेय अथवा महाविद्यालयीन शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. ते संस्कृतचे पदवीधर होते. त्यांचे वाचन अफाट होते. संस्कृतपासून ते उर्दू शेरोशायरीपर्यंतचे कितीतरी साहित्य त्यांना मुखोद्गत होते.
अभिषेकींनी मराठी रंगभूमीसाठी खूप मोठे योगदान दिलेले आहे. विद्याधर गोखल्यांच्या नंतरच्या काळात मराठी रंगभूमीला आलेली मरगळ दूर करून रंगभूमी पुन्हा टवटवीत झाली ती १९६४ साली आलेल्या वसंत कानेटकर लिखित आणि गोवा हिंदू असोसिएशन निर्मित संगीत मत्स्यगंधा या नाटकामुळे. या नाटकातल्या पदांचे संगीत अभिषेकींचे होते. त्यांनी एकूण १७ नाटकांना संगीत दिले. गोवा कला अकादमीच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता.
अभिषेकींनी जसे स्वतः संगीत दिले तसे दुसऱ्यांच्या संगीत दिग्दर्शनातही ते गायले. आकाशवाणीसाठी केलेल्या बिल्हण या संगीतिकेत पु. लं.च्या संगीत दिग्दर्शनात ते गायले. यातली गीते मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली होती. तर वैशाख वणवा या चित्रपटासाठी दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेले “गोमू माहेरला जाते हो नाखवा” हे गीतही त्यांनी म्हटले.
१९८८ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.
📌 १९२९ : पद्मश्री पुरस्कार सन्मानित शास्त्रीय गायक व संगीत अभ्यासक पं. जितेंद्र अभिषेकी यांचा जन्म
(मृत्यू : ७ नोव्हेंबर, १९९८)
━━━━━━━━━━━━━━━━━━
📜 घटना 📜
▫️ १७९२ : अठराव्या लुईचे साम्राज्य बरखास्त केले आणि फ्रेंच प्रजासत्ताकाचा जन्म झाला.
▫️ १९३४ : प्रभातच्या दामले यांनी सरदार किबे यांचे लक्ष्मी थिएटर भाड्याने घेऊन प्रभात चित्र मंदिर पुण्यात सुरू केले.
▫️ १९४२ : दुसरे महायुद्ध — युक्रेनमध्ये नाझींनी २८०० ज्यू लोकांची हत्या केली.
▫️ १९६४ : माल्टा देश युनायटेड किंग्डमपासून स्वतंत्र झाला.
▫️ १९६८ : रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) ची स्थापना झाली.
▫️ १९८१ : बेलीझ देश युनायटेड किंग्डमपासून स्वतंत्र झाला.
▫️ १९९१ : अर्मेनिया हा देश सोव्हिएत संघापासून स्वतंत्र झाला.
━━━━━━━━━━━━━━━━━━
🕯️ मृत्यू 🕯️
▫️ १७४३ : जयपूर संस्थानचे राजे सवाई जयसिंग यांचे निधन.
(जन्म : ३ नोव्हेंबर, १६८८)
▫️ १९८२ : मराठी कवी, कलाकार व अनुवादक सदानंद रेगे यांचे निधन.
(जन्म : २१ जून, १९२३)
▫️ १९९२ : चित्रपट निर्माते ताराचंद बडजात्या यांचे निधन.
(जन्म : १० मे, १९१४)
▫️ २०१२ : पत्रकार, द हिंदू वृत्तपत्राचे संपादक गोपालन कस्तुरी यांचे निधन.
(जन्म : १७ डिसेंबर, १९२४)
━━━━━━━━━━━━━━━━━━
🎂 जन्म 🎂
▫️ १९३९ : भारतीय तत्त्वज्ञानी, शैक्षणिक अभ्यासक व राजकारणी स्वामी अग्निवेश यांचा जन्म.
(मृत्यू : ११ सप्टेंबर, २०२०)
▫️ १९४४ : चित्रपट निर्माते, कवी, कलाकार व सामाजिक कार्यकर्ते राजा मुजफ्फर अली यांचा जन्म.






