ओंकार शुगर कॉर्पोरेशन्समध्ये विविध पदांसाठी भरती

माढा : म्हैसगाव (ता. माढा, जि. सोलापूर) येथील ओंकार शुगर कॉर्पोरेशन्स प्रा. लि. (युनिट क्र. ६) येथे आगामी गळीत हंगामासाठी अभियांत्रिकी आणि उत्पादन विभागातील विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. पात्र व अनुभवी उमेदवारांसाठी कारखाना कार्यस्थळावर थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.
अभियांत्रिकी विभागात इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, वाइंडिंग फोरमन व अटेंडंट, फायरमन, बॉयलर हाऊस फिटर, मॅन्युफॅक्चरिंग फिटर, वायरमन, वर्कशॉप फोरमन, टर्नर, वेल्डर, खलाशी, क्रेन ऑपरेटर, केन टिपलर ऑपरेटर, मिल अटेंडंट, आरबीसी अटेंडंट, बॅगास अटेंडंट, फिडिंग अटेंडंट, टर्बाइन ऑइलमन, प्रशिक्षणार्थी अभियंता आणि प्रशिक्षणार्थी हेल्पर आदी पदे उपलब्ध आहेत.
उत्पादन विभागात ज्यूस सुपरवायझर, सेंट्रिफ्युगल मेट, लॅब केमिस्ट, कंटिन्युअस पॅन ऑपरेटर, सल्फिटेशन मेट, ड्रॉमेट आणि ऑक्सिलरी पॅनमन आदी पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. पदांनुसार दहावी, बारावी, आयटीआय, बी.एस्सी. केमिस्ट्री, डीएमई किंवा बीई मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.
इच्छुक उमेदवारांनी संपूर्ण नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, शैक्षणिक पात्रता, अनुभव, सध्याचा पगार आणि अपेक्षित पगार यांची माहिती घेऊन २१ ते २५ सप्टेंबर २०२६ दरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्वखर्चाने कारखाना कार्यस्थळावर मुलाखतीस उपस्थित राहावे, असे व्यवस्थापनाने कळविले आहे.




