साखर क्षेत्राला समर्पित ‘शुगरटुडे’

वेगाने विस्तारणाऱ्या साखर उद्योग क्षेत्राला हक्काचे व्यासपीठ देण्याचा विचार अनेक वर्षांपासून मनात घोळत होता आणि अखेरीस तो मूर्त स्वरूपात येत आहे, ‘शुगरटुडे’ या नावाने! ते मासिक रूपात आपल्या भेटीला येत आहे.
पहिलाच अंक जुलैच्या अखेरीस प्रकाशित करत आहोत. त्यात अनेक नामवंतांनी आपले विचार व्यक्त केले आहेत.
या अंकाचा प्रमुख विषय आहे : देशाच्या एकंदर जीडीपीमध्ये (सकल देशांतर्गत उत्पादन) साखर क्षेत्राचा हिस्सा कसा वाढवता येईल?
- साखर उद्योगाला उभारी देण्याखेरीज हे शक्य नाही. या क्षेत्राचा वेगाने विकास कसा साधता येईल आणि त्यासमोरील समस्य कशा सुटू शकतात यावर भाष्य केले आहे साखर क्षेत्रातील जाणकार आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, महाराष्ट्राचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, राष्ट्रीय साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे आदींनी.
- शेखर गायकवाड यांनी प्रभावी पंचसूत्री मांडलीय, तर धोरणात काय बदल आवश्यक आहेत, यावर भाष्य केले आहे प्रकाश नाईकनवरे यांनी.
- ऊस पिकाबाबत विनाकारण अनेक गैरसमज आहेत, ते कसे दूर करता येतील, याबाबत सांगताहेत प्रख्यात कृषिशास्त्रज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक,
- उसाबाबत काय काय गैरसमज आहेत, याविषयी लिहिताहेत प्रसिद्ध ऊसतज्ज्ञ डॉ. सुरेशराव पवार
याखेरीज
- ऊसतोड कामगारांसाठी सुरू करण्यात आलेले स्व. गोपीनाथराव मुंडे साखर कामगार कल्याण महामंडळ नेमके कसे आहे, यावर प्रकाश टाकला आहे अभ्यासू पत्रकार सुषमा नेहरकर-शिंदे यांनी.
- विक्रमी ऊस उत्पादक संजीव माने यांचे मॉडेल महाराष्ट्रभर कसे राबवता येईल? त्यांची सविस्तर मुलाखत घेतली आहे पत्रकार सुषमा नेहरकर-शिंदे यांनी.
- ब्राझीलसारखे लवचिक धोरण आपल्याकडे का नको, यावर लिहिताहेत ज्येष्ठ पत्रकार भागा वरखडे.
- सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांचे अलीकडेच निधन झाले, त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे पत्रकार भागा वरखडे यांनी ‘साखर उद्योगाचा शब्दकोश’ या लेखातून.
- साखर उद्योगातील अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी यंदा चांगला रिटर्न दिला, त्यावर सोप्या भाषेमध्ये प्रकाश टाकला आहे प्रसिद्ध शेअर बाजार विश्लेषक नंदकुमार कार्किडे यांनी.
- साखर कामगारांच्या नेमक्या समस्यांचा आणि त्यावर कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत, यांचा वेध घेतला आहे अभ्यासक आणि पत्रकार सुखदेव फुलारी यांनी.
- विक्रमी साखर हंगाम आणि इथेनॉलचा चमत्कार! : विशेष लेख
- दीपक कांबळे यांचे ‘साखर कोडे’ देईल तुमच्या बुद्धीला व्यायाम, शिवाय बक्षिसेसुद्धा.
यासह दर्जेदार मजुकराचा ज्ञानवृद्धी आणि माहितीपर खजिनाच आहे या अंकामध्ये. आपली मागणी नोंदवण्यासाठी आजच या क्रमांकावर +91 9552524024 व्हॉट्सअप संदेश पाठवा, किंवा sugartodayinfo@gmail.com, contact@sugartoday.in यावर तुमचा इमेल संदेश पाठवा.
साखर क्षेत्राबरोबरच सहकार क्षेत्रालाही प्रतिनिधित्व मिळावे, असाही या मासिकाचा उद्देश आहे.