भाई जयंत पाटील यांची महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाला सदिच्छा भेट

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे – महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाला माजी आमदार भाई जयंत पाटील यांनी त्यांच्या समस्त अधिकाऱ्यांबरोबर सदिच्छा भेट दिली.त्यात मुख्यतः रामफेडचे सीईओ श्रीकांत पाटील यांचा समावेश होता.. सर्वांचे स्वागत महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे आणि अन्य अधिकाऱ्यानी केले.

महामंडळाच्या कार्यप्रणाली बाबत पाटील यांनी अतिशय आस्थेने विस्तृत माहिती घेतली .. जयंत पाटील हे समृद्ध, राजकीय ,सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा असलेले अत्यंत अभ्यासू आमदार म्हणून गेली २५ वर्षे विधिमंडळामध्ये ओळखले जातात.

.रायगड जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांची अपेक्स फेडरेशन ‘रामफेड’चे अध्यक्ष असून रायगड जिल्हा सहकारी बँकेचेही अध्यक्ष आहेत. या नात्याने त्यांनी रायगड जिल्हा तसेच संपूर्ण कोकण विभागामध्ये सहकारी संस्थांसाठी प्रशिक्षण उपक्रम राबविणे, तसेच महाराष्ट्र सहकार विकास महामंडळासोबत समन्वयाने कोणती कामे संयुक्तपणे करता येतील याबाबत विस्तृत विचारविनिमय केला.त्यांच्या व्यस्त आणि काटेकोर वेळापत्रकातूनही मधूनही त्यांनी जवळजवळ तीन तासापेक्षा जास्त वेळ देऊन महामंडळाच्या प्रत्येक कामाबद्दल सखोल माहिती घेतली..

त्यांनी विचारलेले प्रश्न आणि त्यांचा एकूण सहकार, कृषी, मत्स्य, डेअरी,बँकिंग या विषयांचा गाढा अभ्यासाची चुणूक त्यांनी या प्रश्नोत्तरांदरम्यान सर्वांना दिली..

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »