कृष्णा कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी बाजीराव सुतार

कऱ्हाड – साखर उद्योग क्षेत्रात अनेक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या आणि विविध पुरस्कारांनी गौरवलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी (एमडी) साखर उद्योग क्षेत्रातील अनुभवी आणि जाणकार असलेले बाजीराव सुतार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला.
कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलगुरू तसेच यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना लि. चे ( रेठरेबुद्रुक पो.शिवनगर) चेअरमन डॉ. श्री. सुरेश भोसले (बाबा) यांनी नूतन मॅनेजिंग डायरेक्टर श्री. बाजीराव जी. सुतार यांचे स्वागत केले , तसेच यशस्वी वाटचालासाठी व कृष्णा उद्योग समूहातील प्रवासामध्ये त्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी कारखान्याचे सर्व अधिकारी कर्मचारी व संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते.