श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यात भरती

पुणे : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि. ( श्रीनाथनगर पाटेठाण, ता. दौंड, जि. पुणे) या खासगी नामांकित कारखान्यात विविध सहा जागांसाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात शेतकी विभागात ४, तर प्रशासनातील एका जागेचा समावेश आहे. सदर इच्छुक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रता, वय, बायोडाटा, संपर्क नंबर इ. माहितीसह hrm@shreenathsugar.com. या मेलवर अर्ज पाठविण्याचे आवाहन कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे.
सविस्तर तपशील खालीलप्रमाणे
शेतकी विभाग – शिकाऊ ऊस विकास ओव्हरसियर या पदाच्या 4 जागांसाठी बी.एस्सी ॲग्री ही शैक्षणिक पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. तर गार्डन सुपरवायझरच्या एका पदासाठी गार्डनिंग कोर्स पूर्ण केलेला असावे.
प्रशासन विभाग – स्वीपरच्या एका पदासाठी शिक्षणाची अट नाही.