समर्थ सहकारी साखर कारखान्यात ३६ जागांसाठी भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

२5 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन; विविध तांत्रिक पदांचा समावेश

अंबड : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना लिमिटेडच्या अंकुशनगर येथील युनिट क्रमांक एक आणि सागर येथील युनिट क्रमांक दोनसाठी विविध तांत्रिक पदांवर तातडीने भरती करण्यात येणार आहे. एकूण २० प्रकारच्या पदांसाठी ३६ जागा उपलब्ध असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली आहे.

को-जन, इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्टिलरी विभागांमध्ये ही भरती होणार आहे. यामध्ये सहाय्यक इलेक्ट्रिकल इंजिनिअर, इन्स्ट्रुमेंटेशन कर्मचारी, फिटर, सहाय्यक मेकॅनिकल इंजिनिअर, बॉयलर ऑपरेटर, बॉयलर अटेंडंट, वेल्डर, बॉयलिंग हाऊस फिटर, फिल्टर स्टेशन ऑपरेटर, पॅनमन, ज्यूस सुपरवायझर, सेंट्रिफ्यूगल कर्मचारी, डिस्टिलरी फिटर, बॉयलर फायरमन, गोदाम कर्मचारी आणि इन्स्ट्रुमेंट टेक्निशियन आदी पदांचा समावेश आहे.

संबंधित पदानुसार बीई, डिप्लोमा, एमएससी, बीएससी, आयटीआय अथवा तत्सम शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित कामाचा एक ते २० वर्षांचा अनुभव असणे गरजेचे असून, अर्जदाराचे वय ४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.

इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि संपूर्ण वैयक्तिक माहितीसह आपला अर्ज २5 सप्टेंबर २०२६ पर्यंत कारखान्याच्या पत्त्यावर अथवा hrmsamarthsugar@gmail.com या ईमेल वर पाठवावा. मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागणार असून कोणत्याही प्रकारचा प्रवास किंवा दैनिक भत्ता दिला जाणार नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पत्ता- कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर
कारखाना लि.,अंकुशनगर, ता.अंबड, जि.जालना

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »